इंदापूर : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…
आज दुपारच्या सुमारास बारामतीमध्ये एका युवकाची कोयत्याने वार करीत निर्घृण हत्या करण्यात आली. यानंतर संपूर्ण बारामती परिसर हा हादरून निघाला होता..या घटनेला काही तासच होत नाही तोपर्यंत अशातच आता इंदापूर परिसरात एकावर गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.. इंदापूर शहरातील कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयासमोर हा गोळीबार झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे..
या गोळीबारात सदरील गंभीर जखमी झाला असून या युवकाला तातडीने उपचारासाठी खाजगी दवाखान्यामध्ये दाखल करण्यात आला असल्याची माहिती समोर येत आहे.ज्या युवकावरती गोळीबार झाला त्याचे नाव अद्यापही समजू शकले नसले तरी इंदापूर शहरात पुन्हा एकदा कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणी वरती आला आहे..
गेल्या काही दिवसांपूर्वी इंदापूर शहरात भर चौकात इंदापूरचे तहसीलदार श्रीकांत पाटील यांच्यावरही असा भ्याड हल्ला झाला होता.यानंतर काही दिवसातच या युवकावर गोळीबार झाल्याने इंदापूर शहरात कायदा व सुव्य सुव्यवस्थेचे तीन तेरा झाल्याचे चित्र पाहायला मिळतेय. अशा घटना जर सातत्याने होत राहिल्या, तर महाराष्ट्राचा बिहार व्हायला वेळ लागणार नाही अशी दबक्या आवाजात नागरिकांच्या देखील सुरू आहे..