Ahilyanagar |Sharad Pawar | “अहिल्यानगर नको,अहमदनगर हवं” चक्क शरद पवारांसमोर मुस्लिम समाजाची मागणी..!!


अहिल्यानगर : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क..

गेल्या अनेक वर्षांपासून अहमदनगर जिल्ह्याचे नाव बदलून अहिल्या नगर करावे अशी मागणी सातत्याने धनगर समाजाकडून केले जात होती.यासाठी सातत्याने गोपीचंद पडळकर,राम शिंदे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला होता..या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अहमदनगर जिल्ह्याचे नाव बदलून ‘अहिल्यानगर’ झाल्याची घोषणा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीच्या कार्यक्रमामध्ये केली होती.त्यामुळे जिल्‍ह्याच्‍या नामांतराचा मार्ग सुकर झाला होता.

मात्र आता नगरच्या नामांतराचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.अहमदनदरमध्ये मुस्लीम समुदायाने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना “अहिल्यानगर नको, अहमदनगर हवं”,अशी मागणी केली आहे..आता शरद पवार हे अहमदनगर जिल्हा दौऱ्यावर असताना जामखेड येथील काही मुस्लीम बांधवांनी त्यांचा सत्कार केला.मात्र यावेळी मुस्लीम बांधवांनी आम्हाला “अहिल्यानगर” नको तर “अहमदनगर”च पाहिजे अशा घोषणाही दिल्या.

त्यामुळे पुन्हा एकदा नगरच्या नामांतराचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. संपूर्ण नगर जिल्ह्यातील मुस्लीम समाजाने “अहिल्यानगर” नावाला विरोध केला आहे.सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत असून या व्हिडिओची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा होत आहे.यामुळे आता मुस्लिम समाजाने शरद पवारांसमोर केलेल्या मागणीमुळे राज्यातील धनगर समाजात असंतोष पसरला असून,शरद पवारांनी अहिल्यानगर बाबत आपली भूमिका स्पष्टपणे मांडावी अशी मागणी आता एकमुखाने धनगर समाजाकडून केली जाऊ लागले आहे.विधानसभा तोंडावर असताना शरद पवारांच्या भूमिकेकडे संपूर्ण राज्यातील धनगर समाजाचे लक्ष लागून राहिले आहे..

जर शरद पवारांनी येत्या दोन दिवसात आपली भूमिका स्पष्ट केली नाही तर येणाऱ्या विधानसभेला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार पक्षाच्या उमेदवारांना मतदान न करण्याचा इशारा देखील धनगर बांधवांकडून देण्यात आलाय..या सगळ्या गोष्टीमुळेच आता शरद पवारांची कोंडी झाल्याचं चित्र पाहावयास मिळत आहे.. अहिल्यानगर नामांतरणाबाबत शरद पवार नेमकी काय भूमिका मांडतात याकडे संपूर्ण राज्यातील धनगर समाजाचे लक्ष लागून राहिला आहे..


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *