स्थानिक सर्व्ह करून निष्ठावंत कार्यकर्त्यांना संधी दिली जाईल,शरद पवारांचे कार्यकर्त्यांना आश्वासन..
इंदापूर : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…
गेल्या काही दिवसांपासून हर्षवर्धन पाटलांकडून तुतारी हातात घेण्याचे संकेत दिले जात होते मात्र शरद पवारांनी हर्षवर्धन पाटलांच्या संकेतातून हवाच काढून टाकली. महाराष्ट्रात लोकांमध्ये सध्या चर्चाही आहे की कालपर्यंत इकडे होते आज इथे येत आहेत ही दबक्या आवाजात लोकांमध्ये चर्चा आहे व ही चर्चा इंदापूरमध्ये देखील असल्याचे म्हणत शरद पवारांनी नाव न घेता हर्षवर्धन पाटलांना चिमटा काढला.एकंदरीत पक्षात येण्या अगोदरच शरद पवारांनी केलेल्या वक्तव्यामुळे हर्षवर्धन पाटलांची हवाच निघाल्याच चित्र पहावयास मिळाल..
आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर इंदापूर मतदारसंघात मागील काही दिवसांपासून वेगवेगळ्या राजकीय घडामोडी घडत आहेत.अशातच भाजप नेते माजी मंत्री हर्षवर्धन पाटील लवकरच आपण आपला निर्णय जाहीर करू,असा वक्तव्य केल्यानंतर इंदापुरातील कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली होती.आणि याच पार्श्वभूमीवर इंदापुरातील हजारो कार्यकर्ते व पहिल्या फळीतील नेते यांनी थेट शरद पवारांची भेट घेतली.या भेटीदरम्यान कार्यकर्त्यांनी आपल्या व्यथा शरद पवार यांच्यासमोर मांडल्या.एकंदरीत कार्यकर्त्यांनी मांडलेल्या भावानेपुढे शरद पवारांनी कार्यकर्त्यांना दिलासा देणार सूचक वक्तव्य करून कार्यकर्त्यांच्या मनातील संभ्रमावस्था दूर केलीये.
यावेळी पवार म्हणाले की,लवकरच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची कोअर कमिटी इंदापूर तालुक्यात येऊन तिथला सर्वे केला जाईल.आणि तसेच इंदापुरातील स्थानिक पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा करून त्यांच्या शिफारसी घेऊनच लवकरात लवकर निष्ठावंत कार्यकर्त्यांना संधी देऊ.एकंदरीत शरद पवारांनी केलेल्या या वक्तव्यामुळे हर्षवर्धन पाटील तुतारी हातात घेण्याच्या आशा मावळल्या असून हर्षवर्धन पाटील यांना आता भाजपा मध्येच राहावे लागणार असल्याच चित्र पहायवयास मिळत आहे. शरद पवारांच्या या वक्तव्यामुळे मात्र आता इंदापुरातील शरद पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये असणारा संभ्रम दूर होऊन कार्यकर्त्यांनी शरद पवार निष्ठा बांधताना संधी देतील असा विश्वास व्यक्त केलाय…
एकंदरीतच शरद पवार कार्यकर्त्यांच्या या निर्णयापुढे नेमका काय निर्णय घेता येत याकडे कार्यकर्त्यांचे लक्ष लागून राहिले आहे..तर शरद पवार निष्ठावंत कार्यकर्त्यांना संधी देणार ? याकडे इंदापूर तालुक्यातील कार्यकर्त्यांचे लक्ष लागून राहिला आहे..