इंदापूर : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क..
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर इंदापूर मतदारसंघात मागील काही दिवसांपासून वेगवेगळ्या राजकीय घडामोडी घडत आहेत.त्यातच भाजप नेते माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी आज पितृपंधरावड्या नंतर लोकांच्या मागणीचा विचार करून निर्णय घेणार असल्याचं वक्तव्य होत..लोकशाहीमध्ये कार्यकर्ते हे अग्रस्थानी असतात त्यामुळे कार्यकर्त्यांनी
विधानसभा निवडणूक आपण लढवली पाहिजे असा आग्रह केला जात आहे मात्र या आग्रा बरोबरच चिन्ह कोणतं घ्यायचं काय करायचं याबद्दल जनतेचा आग्रह तीव्र आहे.यावर सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार लवकरच हर्षवर्धन पाटील तुतारी हातात घेण्याची शक्यता वर्तवली जातेय..
हर्षवर्धन पाटलांच्या भूमिकेमुळे इंदापुरातील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचे वातावरण पसरला असून उद्या इंदापुरातून राष्ट्रवादीचे तब्बल 2000 कार्यकर्ते आणि पहिल्या फळीतील नेते शरद पवारांची गोविंद बाग या ठिकाणी भेट देणार आहेत.सकाळी साडेआठच्या सुमारास शरद पवारांची भेट घेऊन लोकसभेला ज्या निष्ठावंतांनी सुप्रिया सुळे यांचे काम केले अशाच निष्ठावंतांना इंदापूर विधानसभेच्या उमेदवारीची संधी द्यावी अशी मागणी करणार असल्याची माहिती मिळत आहे..तसेच हर्षवर्धन पाटलांचे कार्यकर्ते गेल्या काही दिवसांपासून शरद पवारांचा फोटो हर्षवर्धन पाटलांनी तुतारी मध्ये यावी अशी भूमिका घेत असले तरी हर्षवर्धन पाटलांना राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार पक्षात सामील न करून घेण्याची मागणी करणार असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांकडून मिळत आहे..
एकंदरीतच शरद पवार कार्यकर्त्यांच्या या निर्णयापुढे नेमका काय निर्णय घेता येत याकडे कार्यकर्त्यांचे लक्ष लागून राहिले आहे.. तर शरद पवार निष्ठावंत कार्यकर्त्यांना संधी देणार ? का आयाराम उमेदवाराला संधी देणार ? की पलटूराम उमेदवाराला संधी देणार ? याकडे इंदापूर तालुक्यातील कार्यकर्त्यांचे लक्ष लागून राहिला आहे..