शिर्डी : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज (उपसंपादक : सुरज सवाणे )
अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी येथील बहुचर्चित असलेलं सागर शेजवळ खून प्रकरण केवळ डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची रिंगटोन मोबाईलवर वाजल्याने घडून आलं.ह्यावरून कळतं ह्या पुरोगामी महाराष्ट्राला जातीवादी लोकं कसे बदनाम करत आहे ! महाराष्ट्रात फक्त शिर्डीच नाही तर खैरलांजी असेल,जवखेडा असेल, पुणे येथील विराज जगताप, अरविंद बनसोड असेल अशी अनेक प्रकरणं असतील ज्यात केवळ जातीवादामधून खून करण्यात आले.म्हणजे इथला असा एक वर्ग आहे त्याला इथल्या बहुजन वर्गातील लोकांचं जगणं मान्य नाही,स्वताच्या जातीचा अहंकार बाळगून आम्ही किती श्रेष्ठ बाकी लोक कसे तुच्छ हेच त्यांना सांगायचं असतं त्यातून अशी प्रकरण घडत असतात मग त्यावेळेस सत्तेत कोण विरोधक कोण ? ह्याचा जातीवाद्यांना काही घेण देण नसतं,राजकीय मंडळी वोट बँकसाठी त्या प्रश्नावर बोलण्याच नेहमीच टाळत असतात,फक्त आंबेडकरी नेते मंडळी असतील तेच ह्या प्रश्नावर बोलताना दिसतात.
आज महाविकास आघाडी येवून दीड वर्ष आहे,त्यापूर्वी जेव्हा खैरलांजी घडलं तेव्हा काँग्रेस राष्ट्रवादी ह्यांची सत्ता होती खैरलांजीसाठी न्याय मागून अखेर भोतमांगे संपला,पण न्याय मात्र तिथेच संपला.आज भोतमांगे साठी रडायला येतं कारण तीच गत आमची होऊ नये,कारण आम्हाला ही आज सहा वर्ष होत आहे सागरला न्याय मिळवून देण्यासाठी पण न्याय मात्र सहजा सहजी मिळणार नाही त्यासाठी आम्हला सगळ्यांचा आधार हवंय.केंद्रीय सामजिक न्याय राज्यमंत्री रामदासजी आठवले व त्यांच्या पत्नी सीमाताई आठवले ह्या नेहमीच आम्हाला मदत करत असतात,जेव्हा जेव्हा त्यांच्या बांद्रा येथील संविधान बंगल्यावर भेट झाली तेव्हा तेव्हा नेहमीच सागरच्या केसबद्दल सीमाताई विचारपूस करत असतात.आज परत जेव्हा पायल तडवी प्रकरण बद्दल बोलत असताना त्यांना शेजवळ परिवाराबद्दल सुद्धा गहिवरून आलं,त्यांनी त्यांच्या हातात बॅनर घेवून सागरला न्याय मिळावा यासाठी मैदानात उतरण्यासाठी एक पाऊल टाकलं असच म्हणल तर वावगं ठरणार नाही,जर येणाऱ्या मुख्यमंत्री आणि गृहमंत्री ह्यांनी जर ह्यात लक्ष घातलं नाहीतर येणाऱ्या काळात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आणि त्यांचे कार्यकर्ते काय करू शकेल ती येणारी वेळ च सांगेल ह्या बॅनर मधून त्यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्याचे गृहमंत्री ह्यांना जणू इशाराच दिला..