इंदापूर : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क..
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर इंदापूर विधानसभा मतदारसंघात मागील काही दिवसांपासून वेगवेगळ्या राजकीय घडामोडी घडत आहेत.अशातच भाजप नेते माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी आज सुसंवाद मेळाव्यात विविध विषयांवर भाष्य केले असून,पुन्हा एकदा इंदापूर विधानसभा मतदारसंघ चर्चेत आला आहे. माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी आज इंदापुरातील वडापुरीत कार्यकर्त्यांचा सुसंवाद मेळावा घेतला.या मेळाव्यात त्यांनी अनेक मुद्द्यांना हात घातला असून लवकरच ते आपल्या उमेदवारीबाबत आपली भूमिका जाहीर करणार आहेत.
विधानसभा निवडणूक आपण लढवली पाहिजे असा आग्रह कार्यकर्त्यांकडून केला जात आहे मात्र या आग्रा बरोबरच चिन्ह कोणतं घ्यायचं काय करायचं याबद्दल जनतेचा आग्रह तीव्र आहे यावर मी अशी भूमिका मांडली आहे की लोकशाहीमध्ये जनता श्रेष्ठ आहे म्हणून जनतेचा मान राखला जाईल. पितृपंधरवडा संपल्यानंतर या संदर्भातील योग्य तो निर्णय घेणार आहे हा निर्णय घेत असताना जनतेच्या मनात जे आहे त्याचा मी आग्रहाने विचार करणार असल्याचे देखील पाटील म्हणाले..
हर्षवर्धन पाटलांच्या भूमिकेमुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचे वातावरण पसरल असून लवकरच काही कार्यकर्ते आणि पदाधिकारी यासंदर्भात शरद पवार यांची भेट घेणार असून आणि लोकसभेला ज्या निष्ठावंतांनी सुप्रिया सुळे यांचे काम केले अशाच निष्ठावंतांना इंदापूर विधानसभेच्या उमेदवारीची संधी द्यावी अशी मागणी करणार असल्याची माहिती मिळत आहे..एकंदरीतच शरद पवार कार्यकर्त्यांच्या या निर्णयापुढे नेमका काय निर्णय घेता येत याकडे कार्यकर्त्यांचे लक्ष लागून राहिले आहे.. तर शरद पवार निष्ठावंत कार्यकर्त्यांना संधी देणार ? का आयाराम उमेदवाराला संधी देणार ? की पलटूराम उमेदवाराला संधी देणार ? याकडे इंदापूर तालुक्यातील कार्यकर्त्यांचे लक्ष लागून राहिल आहे..