माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांना आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडून होऊ लागला विरोध..
इंदापूर : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क..
आगामी विधानसभा निवडणुकांसाठी राज्यातील सर्वच पक्ष आणि इच्छुक उमेदवार कामाला लागले आहेत. महायुती व महाविकास आघाडीकडून जागावाटपावरील चर्चा अंतिम टप्प्यात आली आहे.नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला घवघवीत यश मिळालं असून पुन्हा एकदा शरद पवारांचा करिश्मा महाराष्ट्राने पाहिला आहे.अशातच इंदापूरातील राष्ट्रवादी काँग्रेस आमदार दत्तात्रय भरणे हे अजित पवार गटात सामील झाल्याने,शरद पवारांनी इंदापुरातून विधानसभेसाठी उमेदवार देण्याचा चंग बांधलाय..
अशातच भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी तुतारी हातात घ्यावी अशी मागणी त्यांच्या कार्यकर्त्यांकडून सातत्याने होत आहे,मात्र आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून जातात हर्षवर्धन पाटील यांना विरोध होऊ लागला आहे.अशातच इंदापूर तालुक्यातील मतदारांच्या मनात,”नको आजी,नको माझी इंदापूर तालुक्याला हवाय नवीन बाजी“.. अशा पद्धतीचे नवे बॅनर इंदापूर तालुक्यात सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागले असून,लोकसभेला ज्या निष्ठावंत कार्यकर्त्यांनी शरद पवारांचे काम केलं त्यांनाच विधानसभेला संधी द्या असे म्हणत हर्षवर्धन पाटील यांना शरद पवारच्या पक्षांच्या पदाधिकाऱ्यांकडून विरोध होऊ लागला आहे.हर्षवर्धन पाटील यांच्या कार्यकर्त्यांकडून शरद पवारांचे बॅनर लावायचे बंद करा अशी मागणी आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून होऊ लागलीये..
इंदापूर तालुक्यातील पदाधिकारी यांनी शरद पवारांची भेट घेत निष्ठावंत कार्यकर्त्यांना इंदापूर विधानसभेचे तिकीट द्या म्हणून करणार आग्रही मागणी केलीये..यामुळे इंदापूर तालुक्यात विधानसभा निवडणुकीच्या आधीच राजकीय वातावरण पहावयास मिळालं.. यामुळे आता शरद पवार गटांकडून आयाराम उमेदवाराला संधी मिळणार ? की निष्ठावान त्यांना संधी मिळणार याकडे इंदापूर तालुक्यातील नागरिकांचे लक्ष लागून राहिले आहे..