BIG BREAKING : इंदापुरातील बड्या नेत्याला “व्हाइट कॉलर क्राइम” पडला महागात; बँकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे 8 कोटी लाटल्याप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने सुनावली सक्तमजुरीची शिक्षा…


इंदापूर : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क..

इंदापूर तालुक्यातील इंडियन ओव्हरसीज’च्या शाखेतून
जुलै २०१३ ते जुलै २०१६ या कालावधीत इंदापूर बँकेच्या शाखेचा तत्कालीन व्यवस्थापक लक्ष्मण राठोडने ४२ शेतकऱ्यांच्या खात्यावरून किसान क्रेडिट कार्ड आणि कृषी हरित कर्ज या योजनेच्या माध्यमातून तब्बल ७.७४ कोटी रुपयांचे कर्ज शेतकऱ्यांच्या संमतीविना दूधगंगा सहकारी दूध संघाचे माजी संचालक अविनाश घोलप आणि हनुमंत साळुंखे यांच्या खात्यावर वळते करून तब्बल आठ कोटी रुपयांचा गैरव्यवहार केला होता.

याप्रकरणी इंदापूर तालुक्यातील दूधगंगा सहकारी दूध संघाचे माजी संचालक अविनाश घोलप यांच्यासह इंडियन वर्सेस बँकेचा तत्कालीन शाखा व्यवस्थापक आणि व्यावसायिकाला केंद्रीय अन्वेषण विभागाच्या भ्रष्टाचार प्रतिबंधक न्यायालयाने तीन वर्षाची सक्तमजुरीची शिक्षा सुनावली.या घटनेमुळे आता इंदापूर तालुक्यातील या बड्या नेत्याच्या व्हाईट कॉलर क्राईमला लगाम लागलाय.

याप्रकरणी अविनाश राजेंद्रकुमार घोलप वय.५८ (रा. घोलपवाडी,इंदापूर),बँकेचा तत्कालीन शाखा व्यवस्थापक लक्ष्मण रामचंद्र राठोड वय.३९ (रा.लिंगापूर व्यावसायिक हनुमंत गोरख साळुंखे वय.४० वर्षे ( रा. करमाळा,जि. सोलापूर ) या आरोपींना सक्तमजुरीची शिक्षा भोगावी लागणार आहे,तर एका आरोपीची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.राठोडला दीड लाख रुपये, तर घोलप आणि साळुंखे यांना प्रत्येक ९५ हजार रुपये दंडही न्यायालयाने ठोठावला असून,तो न भरल्यास अतिरिक्त कारावास भोगावा लागणार आहे.याप्रकरणी इंडियन ओव्हरसीज बँकेचे तत्कालीन वरिष्ठ विभागीय व्यवस्थापक एस.के. श्रीवास्तव यांनी तक्रार दिली होती. त्यानुसार आरोपींविरोधात दीड हजार पानांचे आरोपपत्र दाखल करण्यात आले होते..

या खटल्यात सरकार पक्षातर्फे विशेष सरकारी वकील अभयराज आरीकर आणि अतिरिक्त सरकारी वकील प्रकाश कुमार सोनी यांनी काम पाहिले. त्यांनी १८ साक्षीदार तपासले.‘हा सामाजिक-आर्थिक गुन्हा म्हणजे ‘व्हाइट कॉलर क्राइम’ असून, आरोपींनी राष्ट्रीयीकृत बँकेचे व पर्यायाने सरकारी तिजोरीचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान केले आहे.आरोपींनी लाटलेल्या रकमेचा फायदा घेतल्याचा गुन्हा सिद्ध झाला असून, त्यांना कठोर शिक्षा व जास्तीत जास्त दंड ठोठावण्यात यावा,’असा युक्तिवाद सरकारी वकिलांनी केला.तो ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपींना शिक्षा सुनावली.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *