वाळू माफियांची वाळू चोरी बड्या नेत्याच्या बंगल्याच्या बांधकामासाठी जात असल्याची दबक्या आवाजात चर्चा सूरु…
इंदापूर : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…
इंदापूर तालुक्यात भीमा नदीच्या पात्रातून काही मागील अनेक दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर अवैध वाळू साठा करण्यात येत आहे.वाळू माफियांचे कर्दनकाळ म्हणून ओळखले जाणारे तहसीलदार श्रीकांत पाटील यांची बदली झाल्यानंतर इंदापूर तालुक्यात वाळू माफ यांनी त्यांचे डोकेवर काढायला सुरुवात केली आहे. बेकायदेशीर वाळूची चोरी शासनाच्या नियमांना पायदळी तुडवण्याचे काम सर्रासपणे सुरू असून महसूल विभाग व स्थानिक पोलिसांकडून या वाळू माफियांवर मेहरबानी केल्याचे दिसून येत आहे..
मात्र,वाळू माफियांच्या अवैध वाहतूक वाळू साठ्यांकडे महसूल विभाग दुर्लक्ष करत असल्यामुळे “इंदापुरात महसूल अधिकाऱ्यांची भरली टाळू ही अधिकारी म्हणतात भरा रात्रभर वाळू”या उक्तीप्रमाणे इंदापूर परिसरात राजरोसपणे मोठ्या प्रमाणात अवैध वाळू साठा सुरू आहे.पोलिस प्रशासन, महसूल विभागाच्या ‘हितसंबंधामुळे’ हा सर्व प्रकार गेल्या अनेक दिवसांपासून राजरोसपणे सुरू आहे..असं असताना देखील यातील गंभीर बाब म्हणजे ही वाळू एका बडा नेत्याच्या बंगल्याच्या बांधकामासाठी जात असल्याची चर्चा देखील जोरदार इंदापुरात सुरू आहे.
यामुळे इंदापूरातील हा बडा नेता कोण ही खमंग चर्चा इंदापूर तालुक्यात जोरदार सुरू आहे..जर असे नेते स्वतःच्या स्वार्थासाठी वाळू माफियांना वरदहस्त देत असतील तर ही इंदापूर तालुक्यासाठी गंभीर बाब असल्याची दबक्या आवाजात चर्चा नागरिकांत सुरू आहे. यामुळे या वाळूतस्करांची प्रशासकीय अधिकाऱ्यांवर देखील हल्ला करण्याची धमक होते, आणि अशातूनच प्रशासकीय अधिकाऱ्यांवर हल्ले होण्याचे प्रमाण वाढत आहे..यामुळे या वाळू तस्करी ला केवळ हे वाळू चोर जबाबदार नसून या गोष्टीला हा बडा नेता देखील जबाबदार असल्याची माहिती मिळत आहे..