बारामती : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…
आगामी विधानसभा निवडणुकीला काही दिवसच शिल्लक राहिले आहेत..सर्वच राजकीय पक्षांकडून या संदर्भातील तयारी सुरू करण्यात आली आहे.राज्यातील विविध मतदार संघावर पक्षाकडून दावे प्रति दावे सुरू झाले आहेत.अशातच आता महाविकास आघाडीमध्ये बिघाडी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.बारामती मधून महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या काँग्रेसच्या सरचिटणीस निलेश गजरमल यांनी काँग्रेस पक्षश्रेष्ठींना पत्र लिहीत बारामती विधानसभेसाठी
पवार कुटुंबातील उमेदवाराला आपला व सहकाऱ्यांचा विरोध असल्याचं म्हटलंय..
बारामती मधील तालुका काँग्रेस सरचिटणीस यांच्या पत्रामुळे चर्चांना उधाण आले आहे.यामुळे या पत्रातून काँग्रेसचाच शरद पवारांना बारामतीतून विरोध होत असल्यास दिसून येत आहे.या पत्रातून काँग्रेस पदाधिकारी निलेश गजरमल यांनी बारामती विधानसभा मतदारसंघाचे उमेदवारी ही काँग्रेसलाच मिळावी अशी मागणी केली आहे.असे असताना देखील गेल्या अनेक वर्षापासून काँग्रेस पक्ष हा शरदचंद्र पवार या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष साथ देत आला आहे मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने बहुजन जनतेसाठी कोणतीही विकासाची कामे केलेली नाहीत व मित्र पक्षातील उमेदवारांमध्ये बहुजनांचे नेतृत्व तयार केलेले दिसून नसल्याचा आरोप देखील काँग्रेस पदाधिकारी निलेश गजरमल यांनी केला आहे..
तसेच या पत्रातून बारामती शहरातील ठराविक प्रभागाचाच विकास झाला असल्याचा दावा गजरमल यांनी केलाय यात भिगवन रोड विद्या प्रतिष्ठान गोविंद भाग कॅनल रोड असे ठराविकच ठिकाणे विकसित केले गेले आहेत बारामती लोकसभा व विधानसभा मतदारसंघात जो विकास झाला त्या विकासामध्ये काँग्रेस पक्षाचा बरोबरीचा वाटा असताना देखील सातत्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाकडून काँग्रेस पक्षाचा नामोल्लेख कोठेही केला जात नसल्याचा गंभीर आरोप केलाय.
तसेच बारामती विधानसभा मतदारसंघांमध्ये प्रत्येक जाती धर्मामध्ये एक नेतृत्व आहे ते नेतृत्व भोजनांचा विकास करू शकते म्हणून मी आणि माझ्या काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी यांच्या यांचा राष्ट्रवादी या पक्षातील पवार कुटुंबातील उमेदवारास आमचा विरोध असल्याचे देखील त्यांनी म्हंटलय..त्यामुळे बारामती विधानसभा मतदारसंघासाठी काँग्रेस पक्षाचा उमेदवार द्यावा, जेणेकरून तो उमेदवार सर्वसामान्य गरीब दलित व दीनदुबळ्या जनतेचा आवाज विधानसभेत उठवू शकतो.असा दावा देखील निलेश गजरमल यांनी या पत्राद्वारे पक्षश्रेष्ठींकडे केलेला आहे..
यामुळे या पत्रामागे काँग्रेसचे वरिष्ठ पदाधिकारी आहेत का असा सवाल देखील या निमित्ताने उपस्थित केला जातोय..एकंदरीत काँग्रेसकडूनच आता शरद पवारांना बारामतीत विरोध होत असल्याने यामागे काँग्रेस पक्षातील कोण वरिष्ठ नेते आहेत का ? अशा देखील चर्चाना जोर धरू लागलांय..यामुळे काँग्रेस पक्षश्रेष्ठी या पत्राकडे कसे पाहतात याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे..