BIG BREAKING : शरद पवारांनी आता “हरिनामाचा जप करावा” त्यामुळे त्यांच्या डोक्यात चांगले काम करण्याची इच्छा होईल,भाजपच्या या नेत्याने साधला शरद पवारांवर निशाणा..!!


केवळ शरद पवारांमुळे पुरोगामी महाराष्ट्राला जातीयवादाचा कॅन्सर झालाय,गोपीचंद पडळकरांची जहरी टीका..

मुंबई : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क..

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यामुळे पुरोगामी महाराष्ट्राला जातीयवादाच्या कॅन्सरची लागण झाल्याची विखारी टीका भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी सोमवारी केली.शरद पवारांनी ५० – ६० वर्षांत महाराष्ट्राला लुटण्याचे काम केले. त्यांच्यामुळेच छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराष्ट्राला दिलेली तेजाची झळाळी हरवली, असे ते म्हणालेत गोपीचंद पडळकर सोमवारी म्हणाले की,शरद पवार म्हणतात सत्ता हातात द्या महाराष्ट्राचा चेहरा बदलून दाखवू.मी त्यांच्या अर्ध्या वक्तव्याशी सहमत आहे.

महाराष्ट्राचा चेहरा बदलण्याची असलेली गरज देवेंद्र फडणवीस यांनी पूर्ण केली. याऊलट शरद पवारांमुळे महाराष्ट्राच्या पुरोगामी चेहऱ्याला केवळ जातीयवादाचा कॅन्सर झाला. छत्रपती शिवाजी महाराजांना अपेक्षित असणारा महाराष्ट्र पवारांनी स्वतःची खासगी कंपनी म्हणून वापरला. आदी ही कंपनी पवार प्रायव्हेट कंपनी होती. आता ती सुळे प्रायव्हेट कंपनी झाली आहे.

पवारांची कारकिर्द इतिहासातील काळी पाने

गोपीचंद पडळकर म्हणाले, शरद पवारांमुळे राज्याच्या पुरोगामी चेहऱ्याला जातीयवादाच्या कॅन्सरची लागण झाली. त्यांच्यामुळेच छत्रपती शिवाजी हमाराजांमनी दिलेली तेजाची झळाळी हरवली. शरद पवारांची कारकिर्द ही महाराष्ट्राच्या इतिहासातील काळी पाने आहेत. आता महाराष्ट्राला विकासाचा सर्वसमावेशक चेहरा मिळाला आहे. हा चेहरा बदलून त्यांना पुन्हा महाराष्ट्रावर सरंजामी लादायची आहे का? दलित ओबीसी अत्याचाराचे नवे अध्याय लिहायचे आहेत का?

निवांत राहून हरीनामाचा जप करा

गोपीचंद पडळकर यांनी यावेळी शरद पवारांना निवांत राहून हरीनामाचा जप करण्याचाही सल्ला दिला. ते म्हणाले, शरद पवारांनी जाती-जातीत वाद लावून महाराष्ट्र अशांत ठेवण्याचे व प्रस्थापितांची घरे भरण्याचे काम केले. त्यांनी भ्रष्टाचार, जातीवाद केला. लोकांमध्ये भांडणे लावली. याला कंटाळून महाराष्ट्राच्या जनतेने २०१४ साली परिवर्तन केले. आता पवारांनी निवांत राहून हरीनामाचा जप करावा. त्यातून त्यांच्या डोक्यात चांगले काम करण्याची इच्छा जागृत होईल.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *