पुणे : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठा कडून १८/०८/२०२१ रोजी परिपत्रक काढून महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना येणाऱ्या शैक्षणिक वर्ष २०२१-२२ मध्ये महाविद्यालयीन फी मध्ये काही प्रमाणात सवलत देण्यात आली परंतु सर्वात जास्त असणाऱ्या ट्युशन फी ला त्यातून वगळण्यात आलेले त्यासाठी सम्यक विद्यार्थी आंदोलन च्या वतीने विद्यापीठात जावून कुलगुरु उपस्थित नसल्याने त्यांच्या P.A ला भेटून निवेदन देण्यात आले.त्यावेळी त्यांना सम्यक विद्यार्थी आंदोलन च्या वतीने काही मागणी करण्यात आल्या की,आकारल्या जाणाऱ्या सर्व मध्ये सर्वात जास्त ही ट्युशन फी असते. त्यामुळे विद्यापीठाने त्याबाबत विचार करून येणारे शैक्षणिक वर्ष २०२१-२२ मध्ये कोरोनाच्या महामारीचा तसेच लोकांचा जगण्यासाठीचा आणि विद्यार्थ्यांचा शिक्षणासाठीचा चाललेला संघर्ष लक्षात घेऊन विद्यापीठाने फी सवलती मध्ये ट्युशन फी चा उल्लेख करून ती ट्युशन फी १००% माफ करावी आणि विद्यार्थ्यांची पुढील शिक्षणासाठी येणारी मोठी अडचण दूर करून त्यांच्या उज्वल भविष्यासाठी हातभार लावावा असे सांगण्यात आले.
त्याच बरोबर शैक्षणिक वर्ष २०२०-२१ मध्ये वर्षभर कोरोनाची महामारी व लॉकडाउन असल्यामुळे लोकांचे पैसे कमावण्याची साधने पुर्णपणे बंद होती.त्यामुळे बरेच विद्यार्थी शैक्षणिक वर्ष २०२०-२१ ची महाविद्यालयीन फी अजुन देखील भरू शकलेले नाहीत.ती फी आता भरायची कुठून हा मोठा प्रश्न आता विद्यार्थ्यांसमोर आणि पालकांसमोर उभा आहे.तसेच विद्यापीठ महाविद्यालयीन सर्व फी पुर्णपणे माफ कराल या आशेवर पालक वर्ग बसलेला आहे. त्यामुळे आपण जे विद्यार्थी शैक्षणिक वर्ष २०२०-२१ मधील महाविद्यालयीन फी अजुन देखील भरू शकले नाहीत अश्या सर्व विद्यार्थ्यांची महाविद्यालयीन फी आपण पुर्णपणे माफ करावी अशी देखील मागणी करण्यात आली. याच बरोबर येणारे शैक्षणिक वर्ष २०२१-२२ घेण्यात येणारे सर्व परीक्षा शुल्क या वेळी घेण्यात येवू नये आणि या वर्षात महाविद्यालयाच्या वसतिगृहात प्रवेश घेणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना त्यात मोफत प्रवेश देण्यात यावा अशी देखील मागणी यावेळी करण्यात आली.
मागण्या पुर्ण न झाल्यास विद्यापीठात तिव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा सम्यक विद्यार्थी आंदोलन च्या वतीने देण्यात आला. यावेळी सम्यक विद्यार्थी आंदोलनचे बारामती तालुका अध्यक्ष रोहित भोसले, तालुका संघटक अनिकेत खांडेकर, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे विद्यार्थी परिषदेचे सदस्य प्रितम गुळुमकर तसेच आदी पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.