बारामती उपविभागाच्या अतिरिक्त पोलीस अधीक्षकपदी दौंड एसआरपी ग्रुपचे समादेशक गणेश बिरादार यांची निवड..


बारामती : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…

राज्यात येत्या दोन तीन महिन्यांत विधानसभा निवडणूक जाहीर होणार आहे.या निवडणुकीपूर्वी पोलीस उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या राज्य सरकारने केल्या आहेत.राज्य पोलीस सेवेतील पोलीस उपायुक्त तथा पोलीस अधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांचे बदली आदेश काढण्यात आले.बारामती उपविभागाचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक संजय जाधव यांची धाराशिव जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षकपदी पदोन्नती करण्यात आली असून,त्यांच्या जागी दौंड एस आर पी ग्रुप नंबर ५ चे समादेशक गणेश बिरादार यांची बारामती उपविभागाच्या अतिरिक्त पोलीस अधीक्षकपदी यांची नियुक्ती करण्यात आलीये..

गणेश बिरादार यांनी दौंड शहरातील एस आर पी ग्रुपच्या समादेशक म्हणून काम पाहिले असल्याने दौंड तालुक्यातुन त्यांचे अभिनंदन केले जात आहे..


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *