BIG NEWS : दोघांचे नायलॉन मांजाने गळे चिरल्यानंतर बारामती शहर पोलिसांना आली जाग… अखेर तिघांवर केली कारवाई..!!


बारामती : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…

बारामती शहरात काल दोघांचा चायनीज मांजामुळे गळा आणि चेहरा चिरल्याची गंभीर घटना घडली होती,या दुर्घटनेनंतर अखेर बारामती शहर पोलिसांना जाग आली आणि तिघांवर धाडी टाकत तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय.याप्रकरणी बारामती शहर पोलिसांनी कसबा,जामदार रोड आणि साठेनगर परिसरात धाडी टाकत नायलॉन मांज्याचा मुद्देमाल हस्तगत केलाय. कसबा येथील साठे चौकात सनी धनंजय गवळी,जामदार रोड येथील श्रीपाद चंद्रकांत ढवाण,साठेनगर येथील चेतन अनिल लोखंडे या तिघांवर कारवाई करण्यात आली..

बारामती शहरात चायनीज मांजाची बेकायदेशीरपणे विक्री सुरू असल्याची धक्कादायक बाब समोर आलीये.बारामती शहरातील एका व्यावसायिकाचा गळा कापला गेल्याची घटना घडली.तर दुपारी एका युवकाच्या गालासह मान चायनीज मांजामुळे कापल्याची घटना घडल्याने नागरिकांनी या प्रकरणी नाराजी व्यक्त करत पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण केल्याची जोरदार चर्चा देखील सुरू आहे.या कारवाईत मात्र पोलिसांना अपेक्षित मुद्देमाल मिळाला नसल्याची देखील माहिती सूत्रांकडून मिळाली..

यामुळे कालच्या दुर्घटनेनंतर बारामती शहर पोलिसांना जाग आली असून,त्यांच्याकडून कारवाई सुरू असून देखील अपेक्षित मुद्देमाल मिळाला नसल्याने बारामतीत चायनीज मांजाचा पुरवठा कुणाकडून होतो याचा शोध घेऊन संपूर्ण साठा नष्ट करण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.यामुळे आता शहर पोलीस प्रशासन याकडे किती गंभियाने पाहत कारवाई करतेय याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे..


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *