BREAKING NEWS : नायलॉन मांजा ठरतोय जीवघेणा,बारामती शहरात दोघांचे कापले गळे;शहर पोलिसांकडून चायनीज मांजाबाबत प्रतिबंधात्मक कारवाई का केली जात नाही ? नागरिकांकडून केला जातोय सवाल उपस्थित..


बारामती : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…

बारामती शहरात एकाचा पतंगाच्या चायनीज मांजामुळे गळा कापला गेल्याची घटना ताजी असतानाच दुपारच्या सुमारास एका युवकाचा चेहरा चिरला गेल्याची घटना घडली आहे.त्यामुळे बारामती शहरात एकच खळबळ उडाली आहे. नायलॉन मांजाने गळा कापण्याच्या दोन घटना घडल्या बंदी असतानाही नायलॉन मांजाची छुप्या पद्धतीने विक्री सुरूच असल्याची धक्कादायक बाब समोर आलीये..

बारामती शहरातील एमईएस हायस्कूलजवळ सकाळच्या सुमारास बांधकाम व्यावसायिक अनिल कायगुडे यांचा गळा चायनीज मांजामुळे चिरला गेल्याची घटना घडली असतानाच दुपारी तीन हत्ती चौकात आदित्य उंडे या युवकांच्या मानेसह चेहऱ्याला या चायनीज मांजामूळे गंभीर जखम झाली आहे.सध्या आदित्य उंडे याच्यावर बारामती हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.सकाळपासून या दोन घटना समोर आल्यानंतर बारामती शहरात मोठ्या प्रमाणात चायनीज मांजा विक्री झाल्याची बाब समोर आली आहे. मात्र अशा घटना घडत असताना बारामती शहर पोलीस ठाण्यासह बारामती नगरपरिषद प्रशासनाकडून चायनीज मांजावर प्रतिबंध घातलाच केला नसल्याचं स्पष्ट झाल आहे.

काही सामाजिक संघटनांनी चायनीज मांजाची विक्री करू नये यासाठी बारामती शहर पोलिसांना निवेदनही दिले आहे.मात्र पोलिसांकडून जाणीवपूर्वक या बाबीकडे दुर्लक्ष केले जात आहे अशी स्थिती सध्या पाहायला मिळत आहे.या मांजामूळे काहीजणांना जीव गमवावा लागल्याच्याही काही घटना यापूर्वी घडलेल्या आहेत.असं असताना बारामती शहरात पुन्हा हा चायनीज मांजा विक्रीसाठी येतोच कसा असा सवाल या निमित्तानं उपस्थित होत आहे. दुसरीकडे मागणी करूनही
पोलिसांनी चायनीज मांजाबाबत प्रतिबंधात्मक कारवाई का केली जात नाही ? असा सवाल यांनी यानिमित्ताने उपस्थित केला जातोय..


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *