सोशल मीडियावर पत्र व्हायरल ; कार्यवाहीची मागणी
शिर्सूफळ -: (ता.बारामती)-: येथील मेरगळ वस्ती नजिक गायरान जागेमध्ये जल जीवन मिशन अंतर्गत पाण्याच्या टाकीचे बांधकाम सुरू केले आहे. या जागेवर टाकीचे बांधकाम करण्यासाठी परवानगी दिली आहे का या साठी सामाजिक कार्यकर्ते दत्तात्रय शिंदे यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाला माहिती मागवली होती. हे पत्र सोशल मीडियावर व्हायरल केले संबंधित पत्र वायरल करणाऱ्या वर कारवाई करण्यात यावी अशी मागणी शिंदे यांनी केली आहे.या माहितीमध्ये शासकीय कोणताही आदेश नसताना या ठिकाणी अधिकृतपणे बांधकाम सुरू केले आहे. यामध्ये ठेकेदार तसेच अधिकारी यांचा भोंगळ कारभार समोर आलेला आहे.
शासनाने गायरान जागेवरील अतिक्रमणे हटविण्यास सूचना केलेल्या असतानाही याठिकाणी टाकीचे काम सुरू आहे.शासनाने या गायरान जागेवरील सर्व अतिक्रमणे हटविल्यास ही टाकी सुद्धा काढावी लागणार आहे.त्यामुळे शासनाचे लाखो रुपये पाण्यात जाणार आहे.याचा विचार करून हे काम थांबवावे व खासगी जागेत टाकी बांधन्याची मागणी केली आहे.गायरान जमिनींवरील अतिक्रमणे हटवण्यासाठी प्रशासनाकडून करण्यात आलेल्या उपाययोजना असताना देखील या गायरान जागेवर अशा प्रकारची अतिक्रमणे वाढत चाललेली आहेत. याकडे ग्रामपंचायत प्रशासन तसेच तहसिल प्रशासन याकडे कानाडोळा करीत आहे .
•टाकीला जिल्हाअधिकाऱ्यांनी कोणतीही परवानगी दिली नसताना काम सुरू आहे.गायरान जागेत जिल्हा अधिकाऱ्यांनी परवानगी न देताच टाकीचे बांधकाम सुरू. त्यामुळे त्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.गायरान जागेत अतिक्रमण झाल्याच्या तक्रारींमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. काहींनी त्या ठिकाणी घरे तर जलजीवन प्राधिकरण विभागाने पाण्याच्या टाकीचे बांधकाम सुरू केले आहे. तर काही ठिकाणी व्यावसायिक वापर होत आहे.
चौकट -:…. सोशल मीडिया वर पत्र व्हायरल.
सदर टाकीचे बांधकाम गायरान जागेत सुरू आहे. प्रशासन या कडे दुर्लक्ष करीत आहे. हे काम चूकीच्या पद्धतीने सुरू आहे. जिल्हा परिषद व जिल्हाधिकारी यांच्याकडून कोणताही शासन आदेश आलेला नसताना देखील टाकीचे काम सुरू असल्याची पत्र दत्तात्रय शिंदे यांनी जलजीवन प्राधिकरण विभाग यांना दिले हे पत्र कोणी व्हायरल केले याची चौकशी होऊन संबंधितावर कठोर कारवाई करावी अशी मागणी शिंदे यांनी केली.व ठेकेदारावर काळ्या यादी टाकण्याची व कार्यवाही करण्याची मागणी केली आहे.
……..
ग्रामपंचायत कडून टाकीचे बांधकाम करण्यासाठी ३० तारखेला जीवन प्राधिकरण विभागला आम्ही या टाकी संदर्भात ठराव दिला आहे. ठराव जीवन प्राधिकरण विभाग जिल्हाअधिकाऱ्यांना पाठवतात व परवानगी घेतात.
दत्तात्रय लोणकर. ग्रामसेवक (शिर्सूफळ).
टाकीच्या कामासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडून अजून परवानगी आलेली नाही. आम्ही सर्व प्रक्रिया करून (दि.५) रोजी कागदपत्र मुख्य कार्यकारी अभियंता जिल्हा परिषद यांच्याकडे सर्व पाठवले आहेत. परवानगी मिळाल्यानंतर काम सुरू होईल.
-: सचिन कुंभार . सहाय्यक अभियंता. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण उपविभाग बारामती.)
……..
सदर टाकीची माहिती मिळाली असता या मध्ये टाकीच्या बांधकामाला जिल्हाअधिकारी यांची परवानगी नसताना या ठिकाणी अनधिकृत बांधकाम सुरू आहे. या संबंधीची तक्रार आम्ही केली होती. सदरचे पत्र सोशल मीडियावर व्हायरल करणाऱ्यावर संबधित अधिकारी ठेकेदार यांच्यावर तात्काळ कारवाई करण्यात यावी. व परवानगी घेऊन टाकीचे काम सुरू करावे.
दत्तात्रय शिंदे. तक्रारदार.