शिर्डी : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज ( उपसंपादक : सुरज सवाणे)
केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री तथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (A) गटाचे राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष रामदासजी आठवले यांच्या पत्नी सीमाताई आठवले ह्या नेहमीच गोरगरीब,उपेक्षित, गरजू,जनसामान्यांचे प्रश्न नेहमीच सोडवत असतात,त्यामुळे ते दोघेही जनसामान्यांमध्ये लोकप्रिय आहेत.बहुसंख्य अशा लोकांना अस वाटत की ज्याप्रमाणे केंद्रीय मंत्री रामदास आठवले प्रत्यक्षपणे राजकारणामध्ये सक्रिय राहून जनतेची कामे करत आहे. त्याचप्रमाणे सीमाताईंनी सुद्धा राजकारणात अप्रत्यक्षरीत्या काम न करता प्रत्यक्षरीत्या राजकारणात सक्रिय सहभाग घ्यावा अशी मागणी आता शिर्डी प्रकरणातील शहीद सागर शेजवळ यांचे बंधू आकाश शेजवळ यांनी सीमाताई आठवले यांना केलं आहे.