बारामती : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…
बारामती शहरात अवैध धंद्यांमध्ये वाढ झाली आहे. पोलिसांच्या लुटुपुटूच्या कारवाईमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत.उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सुपे येथील नवीन पोलिस ठाण्याच्या उद्घाटनप्रसंगी अवैध धंद्यांवर कारवाई करण्याच्या सक्त सूचना पोलिसांना दिल्या आहेत.मात्र,पोलिस खरोखरच त्यांच्या सूचनांचे पालन करतील का ? असा प्रश्न सर्वसामान्यांच्या मनात आहे. अवैध दारू विक्री, मटका,तसेच चक्री जुगार,अवैध गुटखा विक्री, हातभट्टी,अवैध मुरूम वाहतूक,अशा अवैध धंद्यांत मोठी वाढ झाली आहे.पोलिसांचा धाक कमी झाल्याने आणि त्यांच्या वरदहस्ताने बिनधास्तपणे धंदे सुरू आहेत.तालुक्यातील सर्वच पोलिस ठाण्यांतर्गत येणार्या बहुतांश गावांत राजरोसपणे धंदे सुरू असूनही स्थानिक पोलिसांनी घेतलेली बघ्याची भूमिका या धंद्यांना बळकटी देत असल्याचे चित्र या भागात पाहायला मिळत आहे. वाढलेल्या चोर्या, अनेक चोर्यांचा तपास न होणे,याचीही यात भर पडत आहे.
अवैध धंदेवाल्यांचे मनोबल एवढे उंचावलेले आहे की, बारामती शहरात अनेक चौकाचौकांमध्ये वरली मटक्याच्या चिठ्ठ्या फाडणारे व ऑनलाइन चक्रीची खुलेआम दुकाने थाटली आहे.तसेच ऑनलाइन चक्रीच्या माध्यमातून उघड्यावर बसून अवैध व्यवसाय जोमात सुरू आहे.या संपूर्ण प्रकाराला ना कुणाचा धाक ना कुणाची भीती उरली असल्याने मोठे धाडस अवैध व्यावसायीक करत आहे.यामुळे आता पवार यांच्या आदेशानंतर तरी गुन्हे कमी होतात का ? हा प्रश्न आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीच या ठिकाणी थेट लक्ष घालण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
गेल्या काही महिन्यांपासून शहर परिसरामध्ये खुलेआम अवैध धंदे सुरू आहे.हा संपूर्ण प्रकार पोलिसांच्या अर्थपूर्ण दुर्लक्षामुळे होत असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान,पोलिस शहर स्टेशन यांच्या कार्यालयापासून हाकेच्या अंतरावरच मटका जुगार जोमात सुरू असताना सुध्दा त्यांच्यावर कारवाई होत नाही.त्यामुळे न वरिष्ठांनी या संपूर्ण प्रकाराकडे लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे…