इंदापूर तालुक्यातील लाकडी येथे संजय गांधी निराधार योजनेची बैठक संपन्न…


ग्रामस्थांच्या वतीने नवनिर्वाचित अध्यक्ष सागर मिसाळ यांचा सत्कार…

नामदेव खरात : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज

इंदापूर तालुक्यातील लाकडी येथे संजय गांधी निराधार योजनेची बैठक व ग्रामस्थांच्या वतीने महाराष्ट्र शासनाच्या शासकीय समितीवर तालुका अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल ग्रामस्थांच्या वतीने नवनिर्वाचित अध्यक्ष सागर बाबा मिसाळ यांचा सत्कार करण्यात आला.तसेच लाकडी मधील अपंग निराधार विधवा तसेच कोविड – १९ मध्ये मृत्यू पावलेल्या कुटुंबासाठी राष्ट्रीय कुटूंब योजनेमधून जास्तीत जास्त लाभ मिळवून देणार असल्याचे देखील संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष सागर मिसाळ यांनी सांगितले.

तसेच अपंग निराधारांसाठी योजना घरोघरी पोहचवली जाणार असल्याचे,व गरजुंना लागेल ती मदत करून जास्तीत जास्त प्रकरण मंजुरी करून देणार आणि हजारो निराधारांचा आधार होणार असे देखील सागर मिसाळ यांनी सांगीतले. यावेळी लाकडी मधील ग्रामस्थांचे त्यांनी मनापासून आभार मानले यावेळी संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष सागर मिसाळ, नवनाथ नरुटे,सामजिक कार्यकर्ते महेश वणवे लाकडी गावचे उपसरपंच संजय उडशीळ,मा.सरपंच काशीनाथ वणवे,मा. उपसरपंच बाळासाहेब खरमाडे,अनिल गायकवाड,नितीन चव्हाण,तात्या खाडे,पोलीस पाटील परमेश्वर ढोले,व ग्रामस्थ उपस्थित होते.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *