मुंबई : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…
निवडणूक आयोगाने अपक्ष उमेदवारांच्या चिन्हांमधून पिपाणी हे चिन्ह गोठवले आहे. नाशिकमध्ये भगरे पॅटर्न उदयाला आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी निवडणूक आयोगाकडे यासंदर्भात तक्रार दाखल केली होती.या तक्रारीमध्ये त्यांनी पिपाणी चिन्हामुळे आम्हाला निवडणुकीमध्ये फटका बसल्याची भावना व्यक्त करत हे चिन्ह रद्द करण्यात यावे अशी मागणी निवडणूक आयोगाकडे केली होती.त्यांच्या या मागणीनंतर निवडणूक आयोगाने अपक्ष उमेदवारांच्या चिन्हांमधून पिपाणी हे चिन्ह गोठवले आहे. शरद पवारांच्या मागणीनंतर निवडणूक आयोगाने हा मोठा निर्णय घेतला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे निवडणूक चिन्ह तुतारी आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये अपक्ष उमेदवारांना पिपाणी हे चिन्ह दिले होते. पिपाणी हे चिन्ह तुतारीसारखेच दिसत असल्यामुळे शरद पवार गटाला लोकसभा निवडणुकीमध्ये मोठा फटका बसला असावा, अशी भावना राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने व्यक्त केली होती. त्यामुळे पिपाणी चिन्ह रद्द करण्यात यावे अशी मागणी त्यांनी केली होती. त्यांच्या मागणीची दखल घेत निवडणूक आयोगाने हे चिन्ह गोठवले आहे. आता कोणत्याही अपक्ष उमेदवाराला पिपाणी चिन्ह दिले जाणार नाही अशी माहिती समोर येत आहे.
लोकसभेला पिपाणीमुळे बसलेला फटका विधानसभा निवडणुकीमध्ये बसू नये यासाठी शरद पवार यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार आणि सर्वोच्च न्यायालयात याचिका केली होती. याची दखल घेत निवडणूक आयोगाने पिपाणी चिन्ह गोठवलं आहे.शरद पवारांनी या निवडणुकीची दखल घेत हा फटका विधानसभा निवडणुकीत बसू शकतो हे लक्षात घेता त्यांनी सर्वोच्च न्यायालयात तक्रार दाखल केली होती. त्यांनी दाखल केलेल्या याचिकेनंतर राज्य निवडणूक आयोगाने पिपाणी चिन्ह गोठवण्याचा निर्णय घेतला आहे.