राज्यमंत्र्यांकडून तालुका क्रीडा अधिकारी चावलेंचे कौतुक…
इंदापूर : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क
इंदापूर क्रीडा संकुलात बास्केटबॉल स्केर्टीग व विविध सुविधांच्या उद्घाटन प्रसंगी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे बोलत होते.निधी उपलब्ध करून देतो परंतु थोडा वेळ लागेल कारण त्याचे टेंडरिंग करावे लागेल, नाहीतर तुम्ही म्हणाल..आला वटवट केली निघून गेला काही दिले नाही… यावर एकच हशा पिकला..यावेळी बोलताना राज्यमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले की इंदापूर तालुक्यातील नागरिकांनी अवश्य भेट द्यावी असे क्रीडा संकुल तयार आहे.या क्रीडांगणा तून तालुक्यातील अनेक युवक अधिकारी’ खेळाडू तयार होतील याचा आम्हाला अभिमान आहे.
यावेळी बोलताना तहसीलदार श्रीकांत पाटील यांनी क्रीडांगणात खेळाडूंसाठी तसेच इंदापूर तालुक्यातील स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सुसज्ज वाचनालयाची व होस्टेल ची गरज असल्याची बाब राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या लक्षात आणून दिली. तसेच या क्रीडांगणात अनेक सुविधा उपलब्ध आहेत परंतु एक सुसज्ज स्विमिंग टॅंक उपलब्ध करून देण्याची मागणी शहराध्यक्ष बाळासाहेब ढवळे यांनी केले यावेळी बोलताना राज्यमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले की. क्रीडा अधिकारी चावले यांनी किती निधी लागेल ते सांगावे तेवढा निधी येणाऱ्या वर्षभरात उपलब्ध करून देण्याची हमी यावेळी राज्यमंत्री भरणे यांनी दिली.यावेळी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी बास्केटबॉल, स्केटिंग व १०० मीटर धावणे या मध्ये सहभाग घेऊन खेळाडूंसोबत खेळाचा आनंद लुटला.
मी सावज हेरून नेम धरून कार्यक्रम करतो..
माझं कसं आहे.. खेळाच्या मैदानात नेमबाजी करत असताना बाण हुकला परंतु मी आधी अंदाज घेतो.. मग सावज हेरतो..मंग नेम धरून कार्यक्रम करतो. असे म्हणतात उपस्थितांमध्ये हशा पिकला व नेमबाजीत ला नेम चुकला असला तरी राज्यमंत्री भरणे यांचे राजकारणातील पुढचे सावज कोण याची चर्चा रंगली..यावेळी क्रीडा अधिकारी महेशकुमार चावले यांच्या कामाचे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे जिल्हा अध्यक्ष प्रदीप गारटकर यांच्यासह सर्व उपस्थितांनी कौतुक केले. चावले यांनी क्रीडा अधिकारी म्हणून पदभार स्वीकारल्यापासून इंदापूर क्रीडा संकुलात अनेक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले व तालुक्यातील युवकांसाठी एक सुसज्ज असे व्यासपीठ तयार केले गेले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, हनुमंत कोकाटे,बाळासाहेब ढवळे,अतुल झगडे,दिलीप पाटील, तहसीलदार श्रीकांत पाटील, गट विकास अधिकारी विजयकुमार परीट,क्रिडा अधिकारी महेशकुमार चावले, निवासी नायब तहसीलदार अनिल ठोंबरे उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राध्यापक शरद झोळ यांनी केले तर आभार मोहिते सर यांनी व्यक्त केले.