बारामती महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्युज नेटवर्क
बारामती तालुक्यातील माळेगाव खुर्द येथील बारामती कृषी विज्ञान केंद्राच्या महिला वॉश रूममध्ये एक नवजात स्त्री जातीचे मृत अर्भक सापडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे..ही बाब कृषी विज्ञान केंद्राच्या लक्षात आली.त्यानंतर तात्काळ पोलिसांना पाचारण करण्यात आले.याप्रकरणी कृषी विज्ञान केंद्राचे असिस्टंट मॅनेजर कृष्णा हनुमंत तावरे,वय.३५ ( रा. माळेगाव खुर्द,ता.बारामती ) यांनी माळेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.मंगळवारी दुपारच्या सुमारास ही घटना उघडकीस आली..
याबाबत सविस्तर माहिती अशी की,फिर्यादी तावरे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार माळेगांव खुर्द येथील कृषी विज्ञान केंद्राच्या महिला वॉश रूममध्ये लहान नवजात स्त्री जातीचे अर्भक कोणीतरी अज्ञात व्यक्तीने बालकाचा जन्म झाल्याचे लपवून ठेऊन बालकाची देखभाल न करता त्याचा मृत्यू घडवून आणण्याच्या उद्देशाने त्यास उघड्यावर टाकून दिले असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.यावरून अज्ञात व्यक्ती विरोधात माळेगांव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नागरगोजे हे करीत आहेत..
बातमी चौकट :
आढळून आलेले मृत नवजात स्त्री जातीचे अर्भक अनैतिक संबंधातून तर जन्माला आले असावे की मुलगी नको म्हणून मृत अवस्थेत बाळ टाकणाऱ्या
अज्ञात व्यक्तीचा शोध घेण्यात येईल…
संजय नागरगोजे ( पोलीस उपनिरीक्षक माळेगाव पोलीस ठाणे )