बारामती : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क..
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज मुंबई दौरा आटोपून आषाढी एकादशीसाठी बारामती विमानतळाहून पंढरपूरकडे जात असताना,बारामती विमानतळावर मुख्यमंत्र्यांचे स्वागत करण्यासाठी आलेल्या भाजपच्या पदाधिकाऱ्यांना बारामती तालुका पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक विजयसिंह चौहान आणि पोलीस कर्मचारी राम कानगुडे यांनी धक्काबुक्की केल्याचा गंभीर आरोप भाजपा युवा मोर्चाचे सरचिटणीस वैभव सोलनकर यांनी केलाय..यावेळी पोलीस कर्मचारी कानगुडे यांनी भाजप युवा मोर्चाचे पदाधिकारी यांच्या छातीत बुक्की मारल्याचा देखील गंभीर त्यांच्याकडून केला गेलाय..
यावेळी भाजपा युवा मोर्चाचे सरचिटणीस वैभव सोलनकर यांनी ही बाब मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कानावर घातली असता,मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील तात्काळ याची दखल घेत पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांना यापुढे असे प्रकार घडता कामा नये अशा सूचना दिल्या..यावेळी देशमुख यांनी देखील इथून पुढे असे प्रकार घडणार नाहीत असे आश्वासन देखील मुख्यमंत्र्यांसमोर भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांना दिल्याची माहिती वैभव सोलनकर यांनी दिली..
अशा घडलेल्या घटनेमुळे मात्र सोलनकर यांनी आम्ही मंत्र्यांना भेटायचे की नाही ? असा सवाल देखील उपस्थित केलाय..यामुळे गृहमंत्री देवेंद्र फडवणीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी देखील या गोष्टीची दखल घ्यावी आणि जाणीवपूर्वक भाजपा कार्यकर्त्यांची असा वागणाऱ्या अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई करावी अशी मागणी देखील केली..यामुळे भाजप कार्यकर्त्यांना मिळत असलेल्या अशा वागणुकीवर गृहमंत्री देवेंद्र फडवणीस यावर नेमकी काय भूमिका घेतात ? याकडे भाजप कार्यकर्त्यांचे लक्ष लागून राहिल आहे..