बँकेने कर्ज न दिल्याने शेतकऱ्याने केली आत्महत्या…कुटुंबीयांचा आरोप…


आत्महत्येपूर्वी लिहून ठेवलेल्या चिठ्ठीत बड्या नेत्याचे नाव….

दौंड : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे शेतकरी पुरता अडचणीत गेला आहे,
त्यातच राज्यात शेतकरी कर्जबाजारी झाला आहे आणि यामुळे राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्याचं सत्र सुरूच आहे.असाच एक प्रकार पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील खडकी गावात घडला असून केवळ जिल्हा बँकेनं कर्ज प्रकरण न दिल्यामुळे एका शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे.मात्र या शेतकऱ्याने आत्महत्येपूर्वी चिठ्ठी लिहून ठेवली आहे.सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, नानासो मच्छिंद्र शेळके असं आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचं नाव आहे.या शेतकऱ्याने जिल्हा मध्यवर्ती बँकेने कर्ज प्रकरण न दिल्याने आत्महत्या करण्याचं पाऊल उचललं असल्याच बोललं जातं आहे.आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेल्या चिट्ठीत या सर्वाचा उलगडा झाला आहे.पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेने कर्ज न दिल्यामुळे या नानासो शेळके यांनी आत्महत्या केली असल्याचा आरोप शेळके यांच्या कुटुंबीयांनी केला आहे.चिठ्ठीत देखील पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष रमेश थोरात आणि अधिकाऱ्यांचे नावे आहेत.

या शेतकऱ्याने दूध व्यवसायावर ३५ लाख रुपये कर्ज मागितले
होते.मात्र,अडीच एकर क्षेत्र असल्याने बँकेने कर्ज देण्याची तयारी दाखवली नाही.त्यामुळे निराश झाल्यामुळे आत्महत्या केली,असल्याची माहिती समोर आली आहे.शेतकऱ्यांनी लिहलेल्या चिठ्ठीत असे म्हणटले आहे की,मी त्यांना निवडणुकीत मदत केली.माझा वापर त्यांनी फक्त मतदानासाठी केला.माझी परिस्थिती नसतानाही त्यांनी कर्ज भरायला लावले.मी ते पैसे बाहेरून जमा केले.मला कर्ज प्रकरणाचे संपूर्ण पेपर जमा करण्यासाठी सांगितले.मी कर्ज पूर्ण भरल्यावर मला कर्ज देण्यास टाळाटाळ केली.मी रमेश थोरात यांना विनंती केली त्यांनी होकार दिला आणि आमच्यासमोर फोनवर सांगितले. नंतर मात्र सोसायटीचे सचिव गडदरे साहेब यांनी आणि संदीप काळे यांनी माझा विश्वासघात केला.मी अजित पवार यांच्याकडे निवेदन दिलं.पण,त्यानंतरही अधिकाऱ्यांनी मला उडवा उडवीची उत्तर दिली.गावात इतर लोकांना कर्ज प्रकरणे देण्यात आली.मी,फक्त दूध व्यवसायासाठी कर्ज मागितले होते.मला खूप त्रास सहन करावा लागला.माझी मानसिक स्थिती खूप बिघडली आहे व असा अन्याय कुणावरही करू नये.माझ्या कुटुंबावर अन्याय होऊ नये. माझ्या मृत्यूनंतर जमीन ही माझ्या नातेवाईकांना द्यावी,असंही शेळके यांनी पत्रात म्हटलं आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *