इंदापूर : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क..
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्यानंतर राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह अजित पवार गटाला मिळाले.आणि यानंतर कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते. यातून अनेक पदाधिकारी हे अजित पवार गटात सामील झाले होते.यानंतर आता शरद पवार गट लोकसभा पार्श्वभूमीवर ऍक्टिव्ह मोडवर आल्याचे पाहायला मिळतेय.यामुळे शरद पवार गटाकडून आता तालुक्यातील पदाधिकारी निवडीला देखील वेग आलाय. इंदापूर तालुक्यातील कुरवली गावचे सुपुत्र अतुल सुर्यवंशी यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार या पक्षाच्या इंदापूर तालुका सोशल मिडीया सेलच्या तालुका अध्यक्षपदी निवड करण्यात आली.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व सोशल मिडीया प्रदेशाध्यक्ष महादेव बालगुडे यांच्या मान्यतेने अतुल सुर्यवंशी यांना खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते जिल्हाध्यक्ष पैगंबर शेख यांच्या सहीचे पत्र देण्यात आले.यावेळी इंदापूर तालुकाध्यक्ष तेजसिंह पाटील,कार्याध्यक्ष महारूद्र पाटील,महिला अध्यक्षा छायाताई पडसळकर,जिल्हा सामाजिक न्याय जिल्हाध्यक्ष सागर मिसाळ,युवक अध्यक्ष अनिकेत निंबाळकर,बारामती लोकसभा सोशल मिडीया अध्यक्ष सोमनाथ भोंग व पक्षाचे इतर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.