पुणे : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…
पुण्यातील गुंड शरद मोहोळ खून प्रकरणातील मुख्य सुत्रधार गणेश मारणे याच्यासह तिघांना गुन्हे शाखेने पाठलाग करून ताब्यात घेतली आहे.गणेश मारणे हा शरद मोहोळ हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी असून तो गेल्या अनेक दिवसांपासून फरार होता अखेर पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने नाशिक रोड इथून गणेश मारणेला अटक केलीये..मारणे हा मोहोळ प्रकरणातील मुख्य आरोपी होता.त्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी पथके रवाना केली होती.आणि अखेर पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने गणेश मारणेसह तिघांना ताब्यात घेतलं आहे.दरम्यान गणेश मारणे याने वकिलांमार्फत अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठी कोर्टात अर्ज केला होता.आणि गणेश मारण्याचा अटकपूर्व जामीन फेटाळण्यात आला होता..
याप्रकरणी पुणे पोलिसांनी गणेश मारणे विठ्ठल शेलार यांच्यासह १६ जणांविरुद्ध पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यांतर्गत (मोक्का) कारवाई करण्याचे आदेश दिले होते..शरद मोहोळचा खून ५ जानेवारी रोजी सुतारदरा परिसरात मुन्ना पोळेकर आणि साथीदारांनी पिस्तुलातून गोळ्या झाडून केला होता.याप्रकरणी गुन्हे शाखेने साहिल उर्फ मुन्ना संतोष पोळेकर,नामदेव महिपती कानगुडे, अमित ऊर्फ अमर मारुती कानगुडे, चंद्रकांत शाहू शेळके, विनायक संतोष गव्हाणकर, विठ्ठल किसन गांदले, ॲड. रवींद्र पवार,ॲड.संजय उडान,विठ्ठल शेलार,रामदास ऊर्फ वाघ्या मारणे,धनंजय मारुती वटकर,सतीश संजय शेडगे, नितीन अनंता खैरे,आदित्य विजय गोळे, संतोष दामोदर कुरपे यांना अटक केलेली होती.तपासात गणेश मारणे आणि विठ्ठल शेलार मुख्य सूत्रधार असल्याचे निष्पन्न झाले होते.आरोपींवर मोक्का कायद्यांतर्गत कारवाई करण्याचा प्रस्ताव पोलीस आयुक्तांना सादर करण्यात आला होता.पोलीस आयुक्तांनी कागदपत्रे पडताळून आरोपींवर मोक्का कारवाई करण्याचे आदेश दिले होते