BIG BREAKING : शरद मोहोळ खून प्रकरणात धक्कादायक माहिती समोर…


मुख्य सुत्रधार गणेश मारणे,विठ्ठल शेलार यांच्यासह १६ जणांवर ‘मोक्का’…

पुणे : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…

पुण्यातील गुंड शरद मोहोळ खून प्रकरणातील मुख्य सुत्रधार गणेश मारणे, विठ्ठल शेलार यांच्यासह १६ जणांविरुद्ध पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यांतर्गत (मोक्का) कारवाई करण्याचे आदेश दिले आहे.शरद मोहोळचा खून ५ जानेवारी रोजी सुतारदरा परिसरात मुन्ना पोळेकर आणि साथीदारांनी पिस्तुलातून गोळ्या झाडून केला होता.याप्रकरणी गुन्हे शाखेने साहिल उर्फ मुन्ना संतोष पोळेकर,नामदेव महिपती कानगुडे,अमित ऊर्फ अमर मारुती कानगुडे,चंद्रकांत शाहू शेळके,विनायक संतोष गव्हाणकर,विठ्ठल किसन गांदले,ॲड.रवींद्र पवार,ॲड. संजय उडान,विठ्ठल शेलार,रामदास ऊर्फ वाघ्या मारणे, धनंजय मारुती वटकर,सतीश संजय शेडगे,अनंता खैरे, आदित्य विजय गोळे,संतोष दामोदर कुरपे यांना अटक केली आहे.

या गुन्ह्यातील तपासात गणेश मारणे आणि विठ्ठल शेलार मुख्य सूत्रधार असल्याचे निष्पन्न झाले होते.आरोपींवर मोक्का कायद्यांतर्गत कारवाई करण्याचा प्रस्ताव पोलीस आयुक्तांना सादर करण्यात आला होता.पोलीस आयुक्तांनी कागदपत्रे पडताळून आरोपींवर मोक्का कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.या गुन्ह्याचा तपास सहायक पोलीस आयुक्त सुनील तांबे करीत आहेत.शरद मोहोळ खून प्रकरणात गुंड गणेश मारणे याचे नाव समोर आले आहे.गणेश मारणे हा या गुन्ह्याचा मुख्य सुत्रधार असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. गणेश मारणे सध्या फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहे त्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पथके रवाना करण्यात आली आहेत.गुन्ह्यातील आरोपी विठ्ठल शेलार याच्यासह इतर सर्व आरोपींची येरवडा कारागृहात न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. दरम्यान,फरार आरोपी गणेश मारणे याने वकिलांमार्फत अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठी कोर्टात अर्ज केला आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *