Baramati : बारामतीत २२ जानेवारीला मटण, चिकन,बीफ विक्री बंद; बारामती नगरपरिषदेचा निर्णय…


बारामती : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क..

बारामतीत २२ जानेवारीला प्रभू श्रीराम यांच्या अयोध्येतील प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त सर्व मटण मार्केट,चिकण मार्केट,बीफ मार्केट,फिश मार्केट बंद करण्याचे आदेश बारामती नगरपरिषदेने काढले आहेत. बारामतीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुकाध्यक्ष ऍड.निलेश वाबळे यांनी मुख्याधिकारी महेश रोकडे यांना निवेदन देत २२ जानेवारी रोजी अयोध्या येथे प्रभू श्रीराम त्यांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळयाचा आनंद आणि उत्साह देशभर साजरा केला जात असल्याने सर्व मटण विक्री व्यवहार बंद करण्याबाबत तसेच बारामती शहरातील श्रीराम मंदिराला विद्युत रोषणाई करण्यात यावी.

अशा मागणीचे निवेदन देण्यात आले होते आणि याचीच दखल घेत मुख्याधिकारी यांनी बारामती नगरपरिषद हद्दीतील नगरपरिषदेच्या मालकीचे व मटन,चिकन,फिश मार्केट मधील गाळेधारकांना तसेच नगरपरिषद हद्दीतील सर्व कत्तलखाने बंद ठेवण्याचे आदेश जारी केले आहेत. याप्रकरणी मुख्याधिकारी यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी तहसीलदार,बारामती शहर पोलीस निरीक्षक, पशुवैद्यकीय अधिकारी,खाटीक गल्ली मटण मार्केट व पान गल्ली मटण मार्केट कसबा बीफ मार्केट यांच्यासह बारामती नगरपरिषदेच्या विविध खात्यातील अधिकाऱ्यांना याबाबतचे निर्देश जारी केले आहेत.

महाराष्ट्रात २२ जानेवारी रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर

२२ जानेवारी २०२४ रोजी अयोध्या येथील श्रीराम जन्मभूमी येथे उभारण्यात आलेल्या भव्य मंदिरात श्रीराममललांची प्राणप्रतिष्ठापना होणार आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम होणार असून, यादिवशी महाराष्ट्रात सार्वजनिक सुट्टी जाहीर करावी, अशी मागणी राज्याचे कॅबिनेट मंत्री आणि मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी पत्राद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ४ जानेवारी २०२४ रोजी केली होती. मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या मागणीला यश आले असून, महाराष्ट्र सरकारद्वारे २२ जानेवारी रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *