BIG BREAKING : बारामती एमआयडीसी परिसरातील धक्कादायक घटना;जन्मजात बाळाचे मुंडक आढळल्याने बारामती हादरली…


बारामती : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…

बारामती एमआयडीसी परिसरातील सुर्यनगरी परिसरात
सायंकाळी साडे नउच्या सुमारास एका नुकत्याच जन्मजात बाळाचे मुंडक आढळून आल्याने एमआयडीसी परिसरात एकच खळबळ उडाली आहे.. स्थानिकांनी पोलीस ठाण्याला माहिती दिल्याने तालुका पोलिसांनी तात्काळ त्याठिकाणी जात याबाबत अधिक माहिती घेतली.

धडाशिवाय केवळ मुंडकं आढळल्यामुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे.हे बाळ स्त्री जातीचे असावे असा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. दरम्यान,हा प्रकार नेमका काय आहे ? त्यामुळे या बाळाचा घातपात झाला की कुत्र्यांनी या बाळाच्या शरीराचा भाग काढून टाकला अशी शक्यता वर्तवली जात आहे.या घटनेनंतर पोलिसांनी तपासाला सुरुवात केली आहे. याप्रकरणी रोईन ग्रामीण रुग्णालयात यात बाळाचे पोस्टमार्टम केले जात आहे..


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *