बारामती : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क..
बारामती तालुक्यातील एका बहाद्दराने भलताच पराक्रम केला आहे.एका मुलींसाबोत लग्न होऊन आठ दिवस उलटत नाहीत तो पर्यंत दुसऱ्या लग्नाची तयारी केली. साखरपुडा दुसऱ्या मुलीबरोबर साखरपुडा करून हळद ही लावली आणि लग्नाच्या वेळी पसार झाला.या घटनेनंतर फसवणूक झालेल्या मुलीने मुलगा यश नवनाथ खोमणे व त्याचे आई,वडील,चुलते व मामा यांच्यावर बारामती तालुका पोलीस ठाण्यात बलात्काररासह ऍट्रॉसिटी कायद्यानव्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी कीं,यश नवनाथ खोमणे याचे चुलते शेखर खोमणे बारामती तालुक्यातील बांबुर्डी येथील वस्तीगृहावर अधीक्षक म्हणून काम कार्यरत आहेत. या वस्तीगृहात पीडित तक्रारदारं मुलीचा भाऊ शिक्षणाला होता.त्यावेळी त्याला भेटायला जात असताना आरोपी यश व पीडित मुलगी याची ओळख झाली.या ओळखीचा फायदा घेऊन पीडित मुलीबरोबर यश याने प्रेम संबंध स्थापन करून त्यांना वेळोवेळी बलात्कार केला.त्यानंतर मुलीला लग्नाचे करण्याचे वचंन देऊन लोणावळा,बारामती इतर ठिकाणी बलात्कार केला.
त्याचवेळी मुलाच्या आई वडिलांनी त्या पीडित मुलीला तू खालच्या समाजाची आहे आमच्या मुलाशी लग्न करू शकत नाही,असे म्हाणून अपमानीत केले. त्याचंवेळी फलटण तालुक्यातील खामगाव येथील एका नात्यातल्या मुलीशी आरोपी यश याचे लग्न लावून दिले.लग्नानंतर पहिल्या प्रेयसीला दिलेला शब्द पाळण्यासाठी परत तिच्याशी लग्न करण्यासाठी यश खोमणे याने दुसऱ्या पीडित मुलीशी साखरपुडा,कडून लग्नाची तारीख पक्की केली.पीडित मुलीच्या आई वडिलांनीं मुलीच्या लग्नाची सर्व तयारी करून हळदी लावून घेतल्या आणि ऐन लग्नाच्या वेळीस मुलाने धुम ठोकली.यातील आरोपी यश नवनाथ खोमणे याला पोलिसांनी अटक केली आहे. पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे करत आहेत.