इंदापूर : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…
आजच्या आधुनिक युगात सोशल मीडिया हे काही जणांसाठी मनोरंजनाचं माध्यम बनलं आहे, तर काहींसाठी अपडेट राहण्याचं माध्यम.पण सोशल मीडिया हे अत्यंत धोकादायक माध्यम आहे. कारण इथे अनेकदा अशा काही गोष्टी पाहायला मिळतात,भल्या भल्यांची दैना होते.पण गेल्या चार पाच दिवसांपूर्वी एक विचित्र घटना समोर आली आहे.इंदापूर तालुक्यातील नीरा नदीकाठी असणाऱ्या गावातील या पठ्ठ्याचा उसाच्या शेतातील तसला व्हिडीओ व्हायरल झालाय. आणि विशेष म्हणजे हा व्हिडीओ बारामती तालुक्यासह आजूबाजूच्या चार तालुक्यात व्हायरल झाल्याची जोरदार चर्चा आहे…
इंदापूर तालुक्यातील नीरा नदीकाठी असणाऱ्या या गावात या महाशयांमुळे निष्पाप कर्मचाऱ्याचा जीव गेल्याची चर्चा होती,मात्र या महाशयांनी आपल्याकडुन काहीच झाले नाही असा अविर्भाव आणत हात झटकले होते.पण म्हणतात ना माणसाने केलेले वाईट कर्म त्याची पाठ सोडत नाही,आणि अशातच जर नियतीचे फासे पडायला लागले,तर माणसाने केलेले कर्म त्याला डोळ्यासमोर दिसू लागते.असाच प्रकार निष्पाप कर्मचाऱ्याचा बळी घेतलेल्या या पठ्ठ्याबद्दल घडलाय. या पठ्ठ्याला व्हिडिओ बनवायची फार हाऊस,त्याने एका उसाच्या शेतात तसलं कृत्य केलं आणि त्याचे व्हिडीओ चित्रीकरण करून व्हिडिओ बनवला.अन तोच व्हिडीओ अनावधानाने म्हणा किंवा त्याच्या कर्माने म्हणा व्हाट्सअप वर स्टेटस म्हणून पडला गेला.मात्र या महाशयांनी व्हिडिओ क्लिप स्टेटसवरून डिलीट मारली खरी पण तोपर्यंत हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झालाय. हे व्हिडीओ चित्रीकरण जवळपास अर्ध्या मिनिटाचे असल्याची देखील चर्चा सुरू आहे..
यात विशेष म्हणजे या महाशयांना मोबाईल मधलं काहीच कळत नसल्याची माहिती देखील समोर आलीये. मात्र या महाशयांनी आपणच केलेल्या कृत्याचा तसला व्हिडिओ चित्रित केला आणि तोच व्हिडीओ अख्ख्या गावभर पोहचला..मात्र या महाशयांनी एका निष्पाप कर्मचाऱ्यांचा बळी बळी घेतल्याचा देखील जोरदार सुरू आहेत,आणि त्याचाच बाबतीत हा प्रकार घडल्याने या महाशयांवर नियतीचे फासे पडायला लागले की काय ? अशी देखील चर्चा या गावांमध्ये जोरदार सुरू आहे..मात्र आता हे प्रकरण नेमके कोणत्या वळणावर येऊन थांबणार ? याकडे संपूर्ण गावाचे लक्ष राहिले आहेत…
( उर्वरित भाग 2 मध्ये व्हायरल व्हिडीओ सत्यता )