BIG BREAKING : बारामतीत दगडफेक तर इंदापुरात ग्रामपंचायत सदस्य पदाच्या निवडणुकीत पराभूत झाल्याने एकाने केला हवेत गोळीबार..!!


इंदापूर तालुक्यातील धक्कादायक घटना वालचंदनगर पोलीसात दोघांविरोधात दाखल झाला गुन्हा…

इंदापूर : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…

राज्यात काल ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल पार पडला…यामध्ये निकालानंतर काही ठिकाणी वादविवादाच्या घटना घडल्या यामध्ये बारामती मधील सायंबाचीवाडी या गावातील निवडणूक निकालानंतर दोन गटांमध्ये दगडफेक झाली तर दुसरीकडे इंदापूर तालुक्यातील काझड गावात ग्रामपंचायत सदस्य पदाच्या निवडणुकित पराभूत झाल्याच्या कारणातून गावात दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने शिवीगाळ करून हवेत गोळीबार केल्याची धक्कादायक घटना घडलीय.

वालचंदनगर पोलिसांनी याप्रकरणी गणेश शिवदास काटकर यांच्या फिर्यादीवरुन काझडमधील राहुल चांगदेव नरुटे आणि समीर मल्हारी नरुटे यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.ही घटना इंदापूर तालुक्यातील काझड मध्ये काझड-अकोले रोडवर अकोले चौकात ही घटना घडली आहे.घटना समजताचं वालचंदनगर पोलिस रात्री उशीरा घटनास्थळी दाखल झाले होते. चौकशी अंती वालचंदनगर पोलीसांनी दोघांवरती गुन्हा दाखल केला असून पोलीस या प्रकरणाची अधिक चौकशी करत आहेत.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *