माळेगाव ( सनी शेख ) : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क
माळेगाव येथील समाज मंदिर, इंग्लिश मीडियम स्कूल, मुंडे वस्ती, वाबळे वस्ती,चोरमले वस्ती-वाघमोडे वस्ती या परिसरातून जाणाऱ्या करावागज-माळेगाव-शिवनगर-शिरवली या रस्त्याचे नूतनीकरण झाल्यामुळे या रस्त्याने होणारी वाहतुक वेगवान झाली होती. यामुळे अपघात होण्याचे प्रमाण वाढले होते. त्यामुळे या परिसरात राहणाऱ्या वरील लोकवस्त्यातील लोकांनी या रस्त्यावरती वेगाने होणाऱ्या वाहतुकीला आळा बसावा म्हणून गतिरोधक बसवण्यासाठी अजित पवार विचार मंचाकडे मागणी केली होती. या गरजेच्या मागणीचा विचार करून रविराज तावरे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागात कडे याबाबत पाठपुरावा केला होता.
या मागणीची सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता सुभाष पाटील,स्वप्नील तांबे यांनी योग्य दखल घेतली व त्यांच्या सूचनेनुसार संबंधित रस्त्यावरती आज गतिरोधक बसवण्यात आले. त्यामुळे या परिसरातील विद्यार्थ्यांनी, तसेच पालकांनी व ग्रामस्थांनी अजित पवार विचार मंचचे व सार्वजनिक बांधकाम विभागाचे आभार मानले. यावेळी युवा नेते रविराज तावरे यांच्यासोबत अमोल गोफणे मुरली खरात,धनंजय वाघमोडे,सतिश वाघमोडे, बाबू वाघमोडे, चेतन वाबळे, मदन वाबळे,किशोर काळे,सुनील काळे,रामदास चोरमले, सतीश चोरमले, हनुमंत चोरमले, रंजीत चोरमले,रवी कोंडे, विकास शिंदे,नवनाथ बुरुंगले,रफिक मुंडे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.