तब्बल सोळा गुन्हे उघडकीस आणत २,६६,००० हजारांचा मुद्देमाल केला हस्तगत…
इंदापूर : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…
इंदापूर तालुक्यात शेतकऱ्यांच्या शेळ्या चोरणाऱ्या टोळीच्या म्होरक्याला पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेने बेड्या ठोकल्यात.या टोळीचा म्होरक्या रवी महादेव चव्हाण वय.३२ वर्षे ( रा.माळीनगर,चरवस्ती,ता. माळशिरस जि.सोलापूर ) असे ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव आहे..या गुन्ह्यात अधिक चौकशी केली असता,आरोपीने त्याच्या चार साथीदारांसह तब्बल सोळा गुन्हे केल्याचे कबूल केले..या गुन्ह्यातील तीस हजारांची रोख रक्कम,गुन्ह्यात वापरलेली चारचाकी आणि दुचाकी असा एकूण २,६६,००० हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे…
याबाबत सविस्तर माहिती अशी की,बारामती उपविभागातील वालचंदनगर परिसरात शेळयांच्या चोरीचे प्रमाण वाढल्याने,पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी गुन्ह्याची उकल करण्याबाबत पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला निर्देश केले होते,त्यानुसार पुणे ग्रामीण गुन्हे शाखेने घटनास्थळी भेटी देत गुन्ह्याची माहिती घेतली असता,या गुन्हयांमध्ये काही संशयित आरोपींची नावे पुढे आल्याने, पोलिसांनी त्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यास सुरूवात केली..या गुन्ह्यातील संशयित आरोपी टोळीचा म्होरक्या रवी चव्हाण हा बावडा चौक येथे आला असल्याची माहिती मिळाल्याने,पोलिसांनी सापळा रचत त्याला ताब्यात घेतले.आरोपीकडे अधिक चौकशी केली असता,त्याने इतर चार साथीदारांचे मदतीने तब्बल सोळा गुन्हे केल्याचे कबूल केले..
ही कामगिरी पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक अंकित गोयल,अप्पर पोलीस अधीक्षक बारामती विभाग आनंद भोईटे,बारामती पोलीस अधीक्षक गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर,सहाय्यक पोलीस निरीक्षक कुलदीप संकपाळ,वालचंदनगरचे सहा. पोलीस निरीक्षक विक्रम साळुंखे,पोलीस उपनिरीक्षक अमित सिदपाटील,टेळकीकर,पोलीस अंमलदार बाळासाहेब कारंडे,रविराज कोकरे,अभिजीत एकशिंगे स्वप्निल अहिवळे,अजय घुले,अतूल डेर,राजू मोमीण, निलेश शिंदे,पोलीस अंमलदार शैलेश स्वामी,गणेश काटकर,चांदणे,किसन बेलदारे,गणेश कळसकर यांच्या पथकाने केलेली असून आरोपीला कोर्टात हजर केले असता,कोर्टाने आरोपीला पोलीस कोठडीत दिली असून, पुढील तपास वालचंदनगर पोलीस स्टेशन करत आहे.