अजित पवार दौंडमध्ये आल्यास त्यांना तीव्र विरोध करू,मराठा बांधवांचा इशारा…
दौंड : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…
राज्यात मागील काही दिवसांपासून मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरू आहे.मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी २४ तारखेला मराठा आरक्षणाबाबत निर्णय घेण्यासाठी सरकारला दिलेला वेळ संपला आहे. यानंतर जरांगे पुन्हा जालन्याच्या अंतरवली सराटी गावात अमरण उपोषणासाठी बसले आहेत. यानंतर राज्यभरात देखील कठोर आंदोलने केली जात आहेत.यादरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवारांना बारामती तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कराखान्याच्या मोळी पूजनाला येण्यास तीव्र विरोध करण्यात आला होता, अजित पवारांनी मराठा बांधवांच्या भावना विचारात घेऊन या कार्यक्रमास येणे टाळले होते,मात्र आता दौंड शुगर कारखान्याच्या गळीत हंगामाच्या शुभरंभाला आणि मोळी पूजनाला अजित पवारांना मराठा बांधवांच्या वतीने बंदी घालण्यात आली..
दौंड शुगरच्या वतीने उपमुख्यमंत्री अजित पवारांसह त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या हस्ते दौंड शुगरच्या गळीत हंगामाचा शुभारंभ करण्यात येणार असल्याबाबत संचालक वीरधवल जगदाळे यांनी निमंत्रण पत्रिका काढली होती..त्याच अनुषंगाने लेखी निवेदनाद्वारे दौंड पोलीस प्रशासनाला आणि तहसीलदार यांना मराठी क्रांती मोर्चाने याबद्दले निवेदन देण्यात आले आहे…हे निवेदन देत अजित पवारांनी या कार्यक्रमाला येऊ नये अन्यथा त्यांना मराठा बांधवांच्या रोषाला सामोरे जावे लागेल अशा ईशारा देखील सकल मराठा बांधवांच्या वतीने अजित पवारांना देण्यात आलाय…
यामुळे आता बारामती नंतर दौंड मध्ये देखील अजित पवारांना मराठा बांधवांच्या वतीने बंदी घालण्यात आलीये ? यामुळे आता अजित पवार या कार्यक्रमाला येणार की ? या कार्यक्रमास जाणे टाळणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे…