सनी शेख : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…
गेल्या काही दिवसांपासून जळगाव कप.या परिसरामध्ये खुलेआम दारू विक्री होत असून पोलीसांनी या दारू विक्रीकडे अक्षम्य दुर्लक्ष केल्याचे चित्र सध्या पहावयास मिळत आहे,यामुळे स्थानिक महिलांनी या अवैध दारू विक्री संदर्भामध्ये पोलिसांच्या कार्यशैलीवर प्रश्न चिन्ह निर्माण केलेय ? पोलीसांना त्यांचे कर्तव्य लक्षात आणून देण्यासाठी स्थानिक महिलांनी पत्रकारंकडे धाव घेऊन जळगाव क,प. व आजूबाजूच्या गावमध्ये दारूबंदी करण्यासाठी व पोलीसांना त्यांचे कर्त्यव्याची जाण करुन देण्यासाठी पत्रकांराकडे एक सह्यांचे पत्र दिले आहे…
दरम्यान काही स्थानिक महिलांनी दिलेल्या पत्रावरुन माळेगाव पोलीस ठाण्याच्या कार्यशैलीवर प्रश्र्न चिन्ह निर्माण झाले आहे तसेच पोलीसांकडून व्यवसायांना का अभय दिल जातंय ? असा प्रश्न देखील या निमित्ताने ग्रामस्थांनकडून बोलेल जात आहे..यामुळे पोलीसांनी आता तरी जागे होऊन जळगाव क.प. व आजूबाजूच्या गावा मध्ये धाड सत्र चालू करुन अवैद्य व्यवसायांवर कारवाई करावी तसेच नागरिकांच्या मनामध्ये मालिन होत चाललेली पोलीस प्रशासनाची ओळख पुन्हा एकदा कामाच्या माध्यमातून निर्माण करावी..अशी मागणी देखील आता जोर धरू लागली आहे…