भिगवण : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क..
इंदापूर तालु्क्यातील भिगवण शहरात सराफ व्यवसायिकाला बलात्काराचा गुन्हा दाखल करतो,अशी बतावणी करून तब्बल ५० लाखांची खंडणी मागण्याचा प्रकार धक्कादायक प्रकार घडकीस आला आहे.या प्रकरणात दोन महिलांचा आणि एका तरुणाचा समावेश आहे,अशी माहिती समोर येत आहे..बलात्काराचा गुन्हा दाखल न करण्यासाठी आरोपींनी सुमारे ५० लाखांच्या खंडणीची सराफ व्यावसायिकाकडे मागणी केली आहे. याप्रकरणी पल्लवी चांदगुडे आणि सुंदर कुसाळकर अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत.. याबाबत सराफ व्यावसायिकाला व्हाट्सएपच्या कॉलच्या माध्यमातून खंडणी मगितल्याचे चित्रीकरण सराफ व्यावसायिकाने केले असल्याची माहिती समोर आली आहे..
याबाबत सविस्तर माहिती अशी की,भिगवण पोलीस ठाण्यात एका पीडित तरुणीने बलात्काराचा गुन्हा दाखल केला असून,या दोन आरोपींनी सन २०१९ ते २०२३ यादरम्यान पीडीतेला ब्लॅकमेलिंग करून तिचा गैरफायदा घेत वेळोवेळी विविध ठिकाणी शारीरिक संबंध प्रस्थापित केले व या प्रसंगाचे व्हिडिओ काढले अशा स्वरूपाची फिर्याद दिल्याने पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. यातील एक आरोपी पत्रकाराचा मुलगा आहे.सदरचा पत्रकार श्रीमंत असल्याने आपण त्याच्याकडून त्याची बदनामी होऊ नये,म्हणून अधिकाधिक रक्कम काढू शकतो.अशी शक्कल या दोन पत्रकारांनी लावली.. याप्रकरणात मुख्य सूत्रधार एक महिला पत्रकार सहभागी झाली..याप्रकरणी सराफ व्यवसायिकाने सुरुवातीला दोन लाख दिल्यानंतर ही या पत्रकारांचा कोटा भरला नाही. आणि त्यांना आणखी पैशाचा मोह सुटलं गेला.
यातील आरोपी हा सराफ व्यवसायिक असल्याने या महिला पत्रकाराने आरोपीच्या नातेवाईकांकडुन आणखी दोन लाखाची खंडणी घेतली..मात्र एवढी मोठी रक्कम घेतल्यानंतरही या महाभाग पत्रकारांच्या तोंडाचे पाणी कमी झाले नाही..आणि हे प्रकरण मिटवण्यासाठी पीडित युवती ही आता ५० लाखांची मागणी करीत असल्याची बतावणी या महाभाग पत्रकारांनी केली.. आणि यानंतर या महाभागांच्या त्रासाला कंटाळून आरोपीच्या नातेवाईक यांनी भिगवण पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि एका महिला पत्रकारासह दोन पत्रकारावर सहा लाखांची खंडणी स्वीकारल्याप्रकरणी आणि ५० लाखांच्या खंडणीची मागणी केल्याप्रकरणी गुन्हा करण्यात आला.. या गुन्ह्याचा अधिक तपास भिगवण पोलीस करीत आहेत..
बातमी चौकट :
बलात्काराचा गुन्हा दाखल न करण्यासाठी या दोन तोतया पत्रकारांनी माझ्याकडून वेळोवेळी सहा लाख रुपये आणि 50 लाखांच्या खंडणीची मागणी केली.. या महाभागांच्या त्रासाला कंटाळून मी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे..फिर्याद दिली असून देखील यातील महिला पत्रकार ही मला मेसेज करून धमकी देत आहे.. यातील फिर्यादींनी अनेक जणांना अशीच खंडणी मागून बेजार केले असल्याची माहिती मला मिळालीय.. यामुळे मी कोण पोलिसांनी या प्रकरणात लक्ष घालून संबंधित तोतया पत्रकारांवर योग्य ती कायदेशीर कारवाई करावी..
फिर्यादी सराफ व्यावसायिक