BIG BREAKING : इंदापूर तालुक्यातील धक्कादायक घटना;माझा बाप पत्रकार आहे,अस म्हणत बलात्कार करणाऱ्या एकांसह निंबोडीच्या साहिल शेखवर भिगवण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल…


भिगवण पोलीस आरोपींना ताब्यात कधी घेणार ? गुन्ह्यातील गाड्या कधी हस्तगत करणार ? भिगवण परिसरात चर्चा सुरू…

भिगवण : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…

इंदापूर तालुक्यातील भिगवण परिसरातील कापड दुकानात काम करणाऱ्या तरूणीला अश्लील फोटो आणि व्हिडीओ दाखवत ब्लॅकमेलिंग करत बलात्कार करणाऱ्या दोघांवर भिगवण पोलीस ठाण्यात लैंगिक अत्याचारासह विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे..याप्रकरणी २१ वर्षीय पीडित तरुणीने दिलेल्या फिर्यादीनुसार आकाश उर्फ बंटी सुरेश पिसाळ ( रा. तक्रारवाडी,ता.इंदापूर ) साहिल अमिन शेख ( रा.निंबोडी,ता. बारामती ) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सदरील प्रकार हा २०१९ ते २०२३ च्या दरम्यान घडलेला आहे…

याबाबत सविस्तर माहिती अशी की,पीडित तरुणी ही २०१९ साली भिगवण परिसरातील एका कापड दुकानात काम करीत होती.आणि आरोपीचे या दुकानात येणे जाणे होते..याचदरम्यान आरोपीने अनेकदा पीडित युवतीला रस्त्यात अडवून तू मला खूप आवडतेस,माझं तुझ्यावर प्रेम आहे,असे दोन तीन वेळा विचारून झाल्यावर पीडित तरुणीने या गोष्टीला पूर्णपणे नकार दिला..यानंतर काही दिवसांनी आरोपीने पीडित युवतीचा मोबाईल नंबर मिळवत कॉल करून त्रास देऊन लागल्याने पीडीतीने त्याच्या त्रासाला कंटाळून काम सोडून, दुसऱ्या ठिकाणी काम पाहिले..

यानंतर देखील आरोपी आकाश पिसाळ हा तरुणीला वारंवार त्रास देऊ लागला..पीडितीचे शिक्षण सुरू असल्याने तिने याबाबत घरच्यांपुढे घडलेल्या प्रकारची वाच्यता केली नाही..यानंतर फेब्रुवारी २०२० मध्ये आरोपी साहिल शेख याने तरुणीचा अश्लील व्हिडीओ दाखवत तिला ब्लॅकमेलिंग करण्यास सुरुवात केली. आणि भेटायला बोलावले आणि जर तू आली नाहीस तर तुझे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करेन अशी धमकी दिली..यामध्ये मदत मिळावी म्हणून पीडित युवतीने हा प्रकार आरोपी आकाश पिसाळ याला सांगत यातून मला बाहेर काढा अशी मागणी केली..याचाच गैरफायदा घेत पिसाळ याने पीडित युवतीला भिगवण परिसरातील व्यंकटेश लॉन्स येथे भेटायला बोलवत तोच अश्लील व्हिडीओ दाखवत MH.42.AY.4040 या चारचाकी गाडीत बळजबरीने शारीरिक संबंध केले,आणि याची वाच्यता केल्यास हा व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी दिली..आणि माझा बाप पत्रकार आहे,त्यांचा मोठा वशिला आहे,त्यामुळे माझे कोणी काय वाकडे करणार नाही ? असे म्हणत पिसाळ याने वारंवार पीडित तरुणीवर बलात्कार केला..

आरोपी साहिल शेख याने देखील वारंवार व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत बलात्कार केला.आणि आरोपी आकाश पिसाळ याने पैसे देऊन तो व्हिडीओ माझ्याकडून घेतला असे पीडित तरुणीला संगितले. यानंतर देखील कोरोना काळात शेख याने बारामती येथील नेहा लॉजवर बोलवून थम्सअप मध्ये नशेची गोळी देऊन शारीरिक संबंध करत आकाश पिसाळ याला बोलवत त्याने देखील पीडितेशी संबंध केले..वारंवार दोघेजण व्हिडीओ दाखवत पीडितेला ब्लॅकमेलिंग करत बलात्कार करू लागले.आणि शेवटी या दोघांच्या त्रासाला कंटाळून पीडितेने पोलीस ठाण्यात दोघांविरोधात तक्रार दाखल केली असे पीडितेने फिर्यादीत महंटले आहे.या गुन्ह्याचा अधिक तपास भिगवण पोलीस करीत आहेत. अद्यापही भिगवण पोलिसांकडून आरोपींना अटक करण्यात आलेली नाही..गुन्ह्यातील चारचाकी गाड्या देखील ताब्यात घेण्यात आलेल्या नाहीत.यामुळे आता भिगवण पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रशचिन्ह निर्माण होऊ लागले आहे.त्यामुळे भिगवण पोलिसांनी तात्काळ या गुन्ह्यातील आरोपींना अटक करावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे…


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *