मराठा समाजाने कधीच यांची जात बघितली नाही मग तो येवल्याचा असो किंवा बीड किंवा बारामतीचा असो….
इंदापूर : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…
मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर आंदोलनाचे हत्यार उपसत राज्यभर रान उठविणारे मनोज जरांगे पाटील यांनी बारामतीत हजारो मराठा बांधवांसमवेत जोरदार सभा घेतली. सभेदरम्यान त्यांनी मराठा आरक्षणाचे महत्व पटवून देत मंत्री छगन भुजबळ, धनंजय मुंडे यांच्यासह पवार यांच्यावर नाव न घेता जोरदार हल्ला चढविला. मराठा समाजाने जात बघितली नाही,मग तो येवल्याचा असो किंवा बीडचा असो किंवा बारामतीचा असो माझ्या बाप जाद्यांनी यांच्यात कधीही जात बघितली नाही.असे म्हणंत जरांगे पाटलांनी बारामतीत सभा घेत थेट पवारांनाच आव्हान दिलय.
यावेळी जरांगे पाटील म्हणाले की, राज्यात मागील 75 वर्षात जेवढे पक्ष झाले त्या पक्षाच्या पक्षांच्या नेत्यांना मोठं करण्याचं काम मराठ्यांच्या बाप जाद्यांनी केलं.. त्यांना मोटर करण्याचं कारण एकच की त्यांनी कधीच जात बघितली नाही.आमचा आहे म्हणून यांना मदत केली..आणि यांच्या पक्षात मान आणि प्रतिष्ठा वाढवली. आणि आज मराठयांची पोर फाशी घ्यायला लागली, आत्महत्या करायला लागली,तरी सगळेजण मराठयांच्या लेकरांच्या विरोधात बोलायला लागले.म्हणजे आम्ही तुम्हाला आमचे म्हणून मदत केली,पण तुम्ही आम्हाला आपलं मानतच नव्हतां. हे आता आमच्या लक्षात आलं आहे.आमच्या पाच लोकांचं तरी तुमच्यासाठी योगदान असणार, त्यामुळे एकदा तरी उपकाराची परतफेड केली पाहिजे.असे म्हणत जरांगे पाटलांनी नाव न घेता छगन भुजबळ धनंजय मुंडे यांच्यासह पवार यांच्यावर नाव न घेता जोरदार हल्ला चढवला..