BIG BREAKING : इंदापूर तालुक्यातील धक्कादायक घटना; मायलेकीचे मृतदेह धक्कादायक अवस्थेत आढळले,नातेवाईकांनी पतीला पोलिसांसमोर चोपले..!!


इंदापूर : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क..

इंदापूर तालुक्यातील हगारेवाडी येथे मायलेकी मृतावस्थेत आढळून आल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे. अश्विनी सागर म्हस्के (वय.२८ वर्षे) व सानवी सागर म्हस्के (वय.४ वर्षे) अशी मृतांची नावे आहेत. ही घटना शुक्रवारी (दि.२०) दुपारी पावणे एकच्या सुमारास राहत्या घरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी मृत अश्विनीचे भाऊ तात्या आण्णा भोंग (रा. निमगाव केतकी, इंदापूर) यांच्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अश्विनी आणि सानवी यांची हत्या केली आहे की त्यांनी आत्महत्या केली हे अद्याप समजू शकले नाही.

याप्रकरणी संशयित आरोपी म्हणून महिलेचा पती सागर म्हस्के याला ताब्यात घेतले आहे.आरोपीला पोलीस घेऊन जात असताना मृत महिलेच्या संतप्त नातेवाईकांनी पोलिसांसमोर मारहाण केली. या घटनेमुळे परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे. जोपर्यंत आरोपीला अटक केली जात नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचा पवित्री नातेवाईकांनी घेतला आहे..

मिळालेल्या माहितीनुसार,तेजश्री शेखर म्हस्के आणि मृत अश्विनी म्हस्के या सख्ख्या बहिणी सख्ख्या जावा आहेत. तेजश्री दुपारी शेतातून घरी आल्या. त्यावेळी घराची खिडकी उघडी दिसली. तेजश्री यांनी खिडकीतून पाहिले असता अश्विनी आणि सानवी यांचा मृतदेह घरातील पत्र्यच्या अँगलला दोरीच्या सहाय्याने लटकल्याचे निदर्शनास आले.या घटनेची माहिती वालचंदनगर पोलीस ठाण्यात देण्यात आली.घटनेचे गांभीर्य ओळखून सहायक पोलीस निरीक्षक विक्रम साळुंखे, पोलीस उपनिरीक्षक मिलींद मिठापल्ली, विजय टिळकेकर,विनोद पवार आणि प्रमोद तापसे घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मृतदेहाचा पंचनामा करुन शवविच्छेदनासाठी इंदापूर येथे पाठवला.ही आत्महत्या आहे की हत्या याचा शोध पोलीस घेत आहेत.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *