१ लाख ६८ हजारांचा मुद्देमाल हस्तगत करीत तब्बल ८ गुन्हे आणले उघडकीस….
सुपा/बारामती : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क..
सुपा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शेतकऱ्यांच्या विद्युत मोटारपंप व केबल चोरणाऱ्या दोघांना सुपे पोलिसांनी ताब्यात घेतलं असून, सुनिल हनुमंत रेवडे वय.३० वर्षे (रा.शेरेवाडी,ता.बारामती,) विश्वनाथ श्रीरंग कांबळे, वय.३२ वर्षे (रा.तरडोली,ता.बारामती ) अशी ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत.पोलिसांनी केलेल्या तपासात आरोपींनी सुपा परिसरासह मोरगाव बाबर्डी, पानसरेवाडी,काळखैरेवाडी परिसरातील शेतकऱ्यांचे सहा विदयुत मोटार पंप आणि ६१५ फुट तांब्याची केबल चोरल्याचे कबुल केले.यावेळी पोलिसांनी त्यांच्या ताब्यातील एक मोटार सायकल,सहा विदयुत मोटार पंप व ६१५ फुट तांब्याची केबल १ लाख ६८ हजारांचा मुद्देमाल हस्तगत केलाय. या गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस हवालदार राहुल भाग्यवंत,रुपेश साळुंखे हे करीत आहेत..
याबाबत सुपा पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की,सुपा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नागनाथ पाटील यांना मिळालेल्या गोपनीय माहिती मिळाली की,शेरेवाडी परिसरात पेट्रोलिंग करीत असताना एक संशयित विनानंबरची दुचाकी भरधाव वेगाने लोणीपाटी मार्गे तरडोली गावच्या दिशेने गेली.पोलिसांनी गाडीचा पाठलाग करून दुचाकीवर असलेल्या दोघांची झडती घेतली असता,आरोपींकडे दोन हातोडे,दोन एक्सापाने आणि एक एक्साब्लेड मिळून आले.. पोलिसांनी आरोपींकडे सखोल चौकशी केली असता, त्यांनी सुपा परिसरातील शेतकऱ्यांच्या ६ विद्युत मोटारपंप आणि ५ ठिकाणच्या ६१५ फूट तांब्याची केबल चोरल्याचे कबूल केले..आरोपींना अटक करून पोलिसांनी गुन्ह्यातील एक मोटार सायकल,०६ विद्युतपंप व ६१५ फूट तांब्याची केबल असा १,६८,७३८ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केलाय…
ही कारवाई पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक अंकित गोयल,अप्पर पोलीस अधीक्षक आनंद भोईटे,बारामती उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुपा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक नागनाथ पाटील, पोलीस उपनिरीक्षक जिनेश कोळी,सहा.पोलीस उपनिरीक्षक वसंत वाघोले,भालचंद्र साळुंखे,पोलीस हवालदार राहुल भाग्यवंत,रुपेश साळुंखे, पोलीस नाईक दीपाली मोहिते, तुषार जैनक,होमगार्ड खोमणे,मोरे यांच्या पथकाने केलेली आहे.