BIG BREAKING : राष्ट्रवादी फुटीनंतर प्रथमच राष्ट्रवादीचे नेते शरद पवार,उपमुख्यमंत्री अजित पवार,सुप्रिया सुळे येणार एकाच मंचावर…


भिगवण येथील अनंतराव पवार इंग्लिश मिडीयम स्कूलच्या नवीन वास्तूच्या उदघाटन प्रसंगी येणार एका मंचावर…

बारामती : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…

अजित पवार यांनी राष्ट्रवादीत बंड करून भाजप आणि शिंदे गटाशी हातमिळवणी केली.त्यानंतर अजित पवार यांना उपमुख्यमंत्रीपदाची आणि त्यांच्या सहकाऱ्यांना मंत्रिपदाची शपथ देण्यात आली.त्यामुळे राष्ट्रवादीच नव्हे तर संपूर्ण देशात खळबळ उडाली आहे.पुतण्याने काकाला दगा दिल्याची जोरदार चर्चा सुरू असून,तसेच पुतण्या अजित पवार यांनी राष्ट्रवादी पक्षावर आणि चिन्हावर दावाच सांगितल्याने आता हे प्रकरण निवडणूक आयोगापर्यंत गेलं आहे.अजित पवार यांनी थेट शरद पवार यांच्या राजकीय वर्चस्वालाच आव्हान दिल्याने काका आणि पुतण्यामध्ये वितुष्ट आल्याचं सांगितलं जात आहे.मात्र,हे बंड ताज असतानाच अजित पवार आणि शरद पवार यांच्यासह सुप्रिया सुळे एकाच मंचावर दिसणार आहे.त्यामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा तर्कवितर्कांना उधाण आलं आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वडिलांच्या नावाने नव्याने सुरू होत असलेल्या इंदापूर तालुक्यातील भिगवण येथील स्वामी चिंचोली येथील अनंतराव पवार इंग्लिश मिडीयम विद्या प्रतिष्ठाण स्कूलच्या नवीन वास्तूच्या उदघाटनप्रसंगी पवार कुटुंबीय एका मंचावर येणार आहेत.२२ ऑक्टोंबर रोजी हा कार्यक्रम पार पडणार आहे.यावेळी या नव्या वास्तूचे उद्घाटन ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या हस्ते होणार आहे.यावेळी शरद पवार यांच्यासोबत सुप्रिया सुळे देखील उपस्थितीत राहणार आहेत.त्यामुळे हे दोन्ही नेते राष्ट्रवादीतील फुटीनंतर पहिल्यांदाच एका मंचावर येणार आहे.त्यामुळे त्याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.तसेच हे दोन्ही नेते खरोखरच एका मंचावर येणार की कार्यक्रमाला जाणं टाळणार याकडेही सर्वांचं लक्ष लागलं आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *