BIG NEWS : इंदापुरात अतुल खूपसेंसह राष्ट्रवादीच्या त्या बड्या युवा नेत्यावर खंडणीचा गुन्हा दाखल…


इंदापूर : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…

इंदापूर तालुक्यात सुरू असलेल्या श्री संत तुकाराम महाराज पालखी मार्गाचे सबठेकेदार एन.पी.इन्फ्रा प्रोजेक्ट प्रा.लि. कंपनीला ५० लाखांची खंडणी मागितल्याप्रकरणी आणि यातील १५ लाख रुपये ऑनलाइन व १० लाख रोख अशी खंडणी घेतल्याप्रकरणी इंदापूर पोलीस ठाण्यात पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याप्रकरणी एन.पी. इन्फ्रा प्रोजेक्ट प्रा.लि. कंपनीचे सुपरवायझर सतीश किसन भूकन यांनी फिर्याद दिली आहे..

जनशक्ती संघटनेचे संस्थापक अतुल खूपसे ( रा. उपळवटे,ता.माढा,जि. सोलापूर ) विजय देशमुख, अविनाश देशमुख दोघेही (रा.टेंभुर्णी,ता.माढा,जि. सोलापूर) बालाजी शिरसकर (रा.उपळवटे,ता.माढा,जि. सोलापूर ) दीपक जाधव ( रा.गलांडवाडी नं.१,ता. इंदापूर,जि.पुणे ) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत.या पाच जणांवर इंदापूर पोलीस ठाण्यात भा.द.वि.कलम ३८४, ३८५,३८७,५००, ५०१,५०६ ( ३४ ) नुसार विविध कलमांव्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय.

याबाबत इंदापूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांनी सप्टेंबर २०२२ ते १६ सप्टेंबर २०२३ या कालावधीत फिर्यादी कुर्टी ते आवाटी,इंदापूर ते अकलूज पालखी मार्ग,नॅशनल हायवे या रस्त्याचे काम चालु असताना अतुल खुपसे,विनय देशमुख,अविनाश देशमुख व बालाजी शिरसकर,दीपक जाधव यांनी संगनमत करून खुपसे यांच्या जनशक्ती संघटना महाराष्ट्र राज्य संघटनेची माढा,करमाळा, टेंभुर्णी व आजूबाजूच्या परिसरात दहशत असल्याने तसेच कंपनीचे काम त्याच परिसरात सुरू असल्याने खुपसे यांच्या संघटनेला घाबरून कंपनीचे नुकसान व कामगारांच्या लोकांच्या जीवितास धोका नको म्हणून त्यांच्या विरोधात यापूर्वी कोणतीही तक्रार केली नव्हती.

तरीही खुपसे यांनी आम्हाला व आमच्या कंपनीला नुकसान तसेच कंपनीत काम करणाऱ्या लोकांच्या जीवितास धोका देण्याची धमकी देवून कंपनीची बदनामी केली.तसेच कंपनीच्या बँक खात्यातून आर.टी.जी. एसद्वारे १५ लाख रुपये व पुणे हडपसर येथे फिर्यादीच्या कमरेस चाकू लावून जिवे मारण्याची धमकी देवून रोख १० लाख रुपये खंडणी घेतली.यावरून गुन्हा दाखल केल्याची माहिती पोलिस निरीक्षक दिलीप पवार यांनी दिली.याबाबतचा पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक राऊत करीत आहेत.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *