POLITICAL NEWS : मोठ्या ताई साळसूदपणाचा आव आणत कुण्या बाबूमिया बलात्काऱ्याला स्क्रिप्टचं वाचन करायला लावलं अस म्हणत चित्रा वाघ यांनी सुप्रिया सुळेंसह नाव न घेता मेहबूब शेख यांचा घेतला समाचार…


मुंबई : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे युवक प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख यांनी भाजपा नेत्या चित्रा वाघ यांच्यावर हल्लाबोल करीत सुपारीबाज नवऱ्याची बायको चारित्र्याबद्दल बोलूच नको अशा शब्दांत मेहबूब शेख यांनी चित्रा वाघ यांच्यावर टीका केली होती.. आणि याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेयर करत चित्रा वाघ यांच्यावर जोरदार हल्ला चढवला होता…

यावेळी चित्रा वाघ यांनी देखील सोशल मीडिया वरती एक व्हिडिओ पोस्ट करत सुप्रिया सुळेंचे नाव न घेता मेहबूब शेख यांच्यावर जोरदार हल्ला चढवला..या पोस्टमध्ये चित्रा वाघ यांनी सुप्रिया सुळे यांचा देखील यांनी जोरदार समाचार घेतला…

ताई…स्वत: साळसूदपणाचा आव आणत कुणा बाबूमिया बलात्काऱ्याला तुम्ही लिहिलेल्या स्क्रीप्टचं वाचन करायला लावलं… मला तुम्हाला आणि तुमच्या चेल्याचपाट्यांना सांगायचंय मी काय आहे आणि माझं कॅरेक्टर काय आहे हे आदरणीय साहेबांना विचारा बोली भाषेत म्हणायचं तर तुमच्या बापाला जाऊन विचारा, अशा शब्दात चित्रा वाघ यांनी सुप्रिया सुळेंवर टीका केलीये.

दरम्यान,सध्या एक लाचखोर नवऱ्याची बायको जिला प्रसिद्धी हवी असते, ती गेल्या दोन दिवसापासून प्रसिद्धीसाठी सुप्रिया सुळेंवर टीका करत आहे. तिला बोललं की तिला महिला आणि बाईपण आठवतं. खरंतर तिचं तोंड उघडलं, भाषा ऐकली की महाराष्ट्रातील प्रत्येक महिलेला तिची भाषा माहिती आहे. तिची भाषा ही महिला आणि बाईपणाला शोभणारी आहे का, हिचं तोंड उघडलं की गटारगंगा तोंडातून बाहेर निघते, असं म्हणत मेहबूब शेख यांनी चित्रा वाघ यांना सुनावलं होतं.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *