BIG BREAKING : अखेर अजित पवारच पुण्याचे दादा;पालकमंत्री पदी विराजमान होताच बारामतीत फटाके वाजवत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी केला जल्लोष साजरा….


बारामती : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील ११ जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांची सुधारित यादी आज जाहीर केलीये..ही यादी पाहून सरकारमध्ये पुन्हा एकदा अजित पवार गटाचा दबाव वाढत असल्याचं दिसून आलं,याच मुख्य कारण म्हणजे अजित पवार यांच्या गटातील सात नेत्यांना पालकमंत्री बसवण्यात आले आहे.पुण्याच्या पालकमंत्रीपदावरून चंद्रकांत पाटील यांची उचलबांगडी करण्यात आली असून अजित पवार यांच्याकडे पुण्याचं पालकमंत्रीपद देण्यात आलं आहे..अखेर अजित पवार हेच पुण्याचे दादा असल्याचं यावरून पुन्हा एकदा सिद्ध झालंय..

अजित पवार हे पुण्याच्या पालकमंत्री पदी विराजमान झाले,अन बारामती मधील राष्ट्रवादी काँग्रेस शहर कार्यालयाच्या वतीने शारदा प्रांगण येथील शहर पार्टी कार्यालयासमोर फटाके वाजवत सरकारच्या निर्णयाचे स्वागत करण्यात आले..यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी यांच्याकडून अजित पवारांचे अभिनंदन करण्यात आले..अजित पवारांच्या माध्यमातून लवकरच पुणे जिल्ह्यातील रखडलेली पूर्ण होतील.आणि याचा फायदा पुणे जिल्ह्यासह बारामती तालुक्याला आणि शहराला होईल असे राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष जय पाटील यांच्याकडून सांगण्यात आले.

यावेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून अजित पवारांच्या कामाचे भरभरून कौतुक करण्यात आले.अजित पवार हे राज्याची जबाबदारी नेहमी सक्षमपणे पार पाडत आहे. आणि अजित पवारांकडे आम्ही पालकमंत्री म्हणून बघत होते असे देखील कार्यकर्त्यांकडून सांगण्यात आले. यावेळी महिला कार्यकर्त्यांनी देखील अजित पवार यांना पालकमंत्री पद मिळणारच होत,कारण अजित पवार काम बोलत आहे.आणि त्यामुळे इथून पुढच्या कालावधीत आम्ही कार्यकर्ते म्हणून दादांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू अस देखील महिला कार्यकर्त्याकडून सांगण्यात आलं.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष जय पाटील,विशाल जाधव,साधू बल्लाळ, प्रताप पागळे, महिला अध्यक्षा अनिता गायकवाड यांच्यासह महिला कार्यकर्त्या आणि कार्यकर्ते उपस्थित होते..


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *