इंदापूर : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…
इंदापुरातील राष्ट्रवादीचे आमदार दत्तात्रय भरणे यांचे खंदे समर्थक व राष्ट्रवादीच्या बड्या युवा नेत्यावर विनाताबा साठेखत करून दिलेल्या जमिनीपेक्षा अधिक जमिनीत अतिक्रमण करून विनापरवाना बेकायदेशीररित्या उत्खनन करून शेतमालकाने विचारले असता, जातीवाचक शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी फसवणुकीसह अॅट्रॉसिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी दीपक बाळासाहेब जाधव याच्यासह दिनेश बाळासाहेब जाधव,बाळासाहेब जाधव या तिघांवर ( रा. गलांडवाडी,ता.इंदापूर,जि.पुणे ) याच्यावर इंदापूर पोलीस ठाण्यात भा.द.वि कलम ४२०, ५०४,५०६,(३४) सह अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कलम ३(१),(r),(s), ६ अधिनियम कलम ७ (१),ड नुसार विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत फिर्यादी सुभाष अर्जुन मिसाळ यांनी फिर्याद दिली आहे..
याबाबत अधिक माहिती अशी की,फिर्यादी सुभाष मिसाळ यांनी बेडशिंगे येथील शेतजमीन गट नं.२२ मधील २ हेक्टर ८९ आर या क्षेत्रापैकी ६० आर क्षेत्र हे संशयित आरोपी दिनेश जाधव याला इंदापूर येथे विनाताबा साठेखत १६,५०,००० रुपयांप्रमाणे करून दिले होते. मिसाळ हे पुण्याला असताना गावकामगार तलाठी यांनी फोन करत मिसाळ यांना शेतजमीन गट नं.२२ मध्ये खोदकाम झाले असल्याने त्याचा पंचनामा करायचा आहे,त्यासाठी तुम्ही स्वतः हजर रहा असे सांगितले. मिसाळ यांनी आपल्या शेतात जाऊन पाहणी केली असता, संशयित आरोपी दिनेश जाधव याला साठेखत करून दिलेल्या जमिनीत उत्खनन केल्याचे दिसून आले.
दुपारच्या सुमारास गाव कामगार तलाठी अजित पाटील यांच्यासह नायब तहसीलदार यांनी सदरील शेतजमीनीचा पंचनामा केल्यानंतर फिर्यादी मिसाळ यांच्या निदर्शनास आले की,जाधव याला साठेखत करून दिलेल्या ६० आर क्षेत्रासह आणखी ६५ आर क्षेत्रात आपल्या परस्पर उत्खनन केल्याचे निदर्शनास आले.सदरील जमिनीती तब्बल ३७.५०० ब्रास खोदकाम केल्याचे महसूल अधिकाऱ्यांकडून फिर्यादींना समजले.व खोदलेल्या जमिनीची शासकीय रॉयल्टी रक्कम तब्बल २ कोटी भरावे लागणार असल्याची माहिती महसूल अधिकाऱ्यांनी फिर्यादी मिसाळ यांना दिली.
याबाबत फिर्यादींनी संशयित आरोपीकडे याबाबत विचारणा केली असता,संशयित आरोपी दिनेश जाधव याने मी तुम्हाला १४ ते १५ लाख ऑनलाइन स्वरूपात दिले असून, तुमचा पुतण्या तानाजी मिसाळ याला देखील पैसे दिलेले असून,ही जमीन आता आमच्या मालकीची झालेली आहे.मात्र फिर्यादीने मी तुम्हाला ६० आर क्षेत्र दिलेलं असून,तुम्ही ६५ आर क्षेत्रात उत्खनन केल्याचे सांगितले असता,संशयित आरोपी दिनेश जाधव याच्यासह भाऊ दीपक जाधव आणि बाळासाहेब जाधव यांनी मिसाळ यांना जातीवाचक शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादींनी फिर्यादीत महंटले आहे..