BIG BREAKING : बारामतीत पिळदार शरीरयष्टीसाठी इंजेक्शन विकणाऱ्या एकाला शहर पोलिसांनी ठोकल्या बेड्या..!!


चौकशीत अनेक जीम मालकांची नावे समोर येण्याची शक्यता…

बारामती : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क

झटपट पिळदार शरीरयष्टी बनवण्यासाठी रक्त पुरवठा नियंत्रित करणारी इंजेक्शन अवैध पद्धतीने जिममध्ये विकाणाऱ्या एकाला अटक करण्यात आली आहे.ही कारवाई बारामती शहर पोलिसांनी केली आहे.बारामती पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अविनाश शिवाजी शिंदे ( रा.पिंपळी,ता.बारामती,जि.पुणे ) या संशयित आरोपीला ताब्यात घेतले आहे.आरोपीवर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे..

याबाबत शहर पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार,
संशयित आरोपी जीम करणाऱ्या लोकांनी शरीर पिळदार होते,असे सांगून इंजेक्शनची विक्री करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले असता,त्यावेळी त्याच्याकडे तब्बल १२
इंजेक्शन बॉटल मिळून आले आहेत.या अटक आरोपीकडून अशा प्रकारचे घातक इंजेक्शन विकणाऱ्या लोकांची नावे पुढे येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.यात बारामती शहरातील काही जिमचे मालक व इतरही अनेकजण गळाला लागण्याची शक्यता देखील पोलिसांनी वर्तवली आहे..या औषधाबाबत पोलिसांनी कळविले असता,अन्न व औषध विभागाचे औषध निरीक्षक सचिन भुवड यांनी या इंजेक्शनचा वापर हृदयविकाराच्या आजारामध्ये केला जात असल्याची माहिती दिली.मात्र सध्या या इंजेक्शनचा उपयोग तरुण मुलेही व्यायाम करून बॉडी बिल्डिंग साठी व व्यसन म्हणून करत असल्याची माहिती दिली..

ही कारवाई पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक अंकित गोयल अप्पर पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण आनंद मोहिते, उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलीस निरीक्षक दिनेश तायडे यांच्यासह गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक युवराज घोडके,पोलीस उपनिरीक्षक गणेश पाटील, पोलीस अंमलदार रामचंद्र शिंदे,अभिजीत कांबळे अक्षय सिताप,दशरथ इंगोले,सागर जामदार,दादासाहेब जाधव यांच्या पथकाने केलेले आहे..

बातमी कोट :

अशा घातक इंजेक्शनमुळे कायमस्वरुपी तंद्री लागणे, ब्लड प्रेशर जास्त राहणे,किडनी निकामी होणे असे दुष्परिणाम होत आहे. त्यामुळे तरुणांनी हे इंजेक्शनचा वापर करणे टाळावे.. यातून अनेक तरुणांचा जीव गेलेला आहे..

सचिन बुगड ( अन्न व औषध सुरक्षा विभाग अधिकारी )

अशा प्रकारे बेकायदेशिरपणे इंजेक्शन बाळगणा-या युवकांबाबत माहिती मिळाल्यास तात्काळ पोलीस स्टेशनला कळवावे.तसेच अशा प्रकारच्या शरीरास घातक असणारे इंजेक्शन घेवून स्वतः चे आरोग्याची तसेच शरीराचे अवयव कायमस्वरुपी निकामी करुन घेण्याऐवजी पारंपरिक व्यायाम करुन शरीरयष्टी कमविण्याकडे तरुणांनी भर द्यावा…

दिनेश तायडे ( बारामती शहर पोलीस निरीक्षक )


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *