बारामती : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क..
महाराष्ट्रातील तमाम धनगर समाजासाठी चौंडी येथील चाललेल्या अमरण उपोषणास पाठिंबा देण्यासाठी व महाराष्ट्रातील तमाम धनगर समाजाला तब्बल ७५ वर्षापासून अज्ञानवासात ठेवून समाजाची पिळवणूक करून आजपर्यंत आम्हाला आमच्या हक्काचे आरक्षण देऊ न शकलेल्या सर्व सरकारांचा जाहीर निषेध व्यक्त करण्यासाठी सकल धनगर समाजाच्या वतीने उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या काटेवाडी या गावात चक्का जाम आंदोलन करण्यात येणार आहे..
महाराष्ट्रातील सर्व धनगर समाज आम्हाला आमच्या हक्काची ST आरक्षणाची अंमलबजावणी करून धनगर समाजाच्या वतीने बुधवारी सकाळी दहा वाजता काटेवाडी (अहिल्यादेवी चौक ) या ठिकाणी भव्य रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार असून,सर्व समाज बांधवांनी मोट्या संख्येने उपस्थित रहावे..असे आवाहन यशवंत ब्रिगेडचे अध्यक्ष बापूराव सोलनकर यांनी समाज बांधवांना केली आहे.यामुळे आता या आंदोलनाला किती समाज बांधव हजेरी लावतात हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे..यामुळे मात्र उपमुख्यमंत्री अजित पवारांची डोखेदुखी वाढणार असल्याची चर्चा देखील सुरू झालीये..