गेल्या चार महिन्यांपूर्वी घडला होता दरोडा…
बारामती : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क..
बारामती तालुक्यातील तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका महिलेस मारहाण करुन एक कोटी सात लाखांचा मुद्देमाल चोरणा-या दरोडेखोरांना पकडण्यात पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेला यश आलय..या प्रकरणी पोलिसांनी सचिन अशोक जगधणे ( रा. गुणवडी,ता.बारामती ) रायबा तानाजी चव्हाण ( रा. शेटफळ हवेली,ता.इंदापूर ),रविंद्र शिवाजी भोसले ( रा. निरावागज, बारामती),दुर्योधन उर्फ दिपक उर्फ पप्पू धनाजी जाधव ( रा.फलटण ),नितीन अर्जून मोरे (रा. धर्मपुरी,ता.माळशिरस, जि.सोलापूर) याच्यासह रामचंद्र वामन चव्हाण ( मूळ रा.आंदरुड,ता.फलटण,जि.सातारा सध्या ( रा.खटाव,जि.सातारा ) या टोळीला विविध ठिकाणांहून पकडले.
याबाबत पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक यांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार,जमीन खरेदी विक्री करणा-या सागर गोफणे यांच्याकडे भरपूर पैसे असल्याची माहिती सचिन जगधने याला मिळाली होती. २१ एप्रिल २०२३ रोजी तिरुपती बालाजीच्या दर्शनाला गेले होते.त्याच दिवशी रात्री अनोळखी चोरट्यांनी तृप्ती यांना मारहाण करत ९५ लाख ३० हजाराची रोकड,११लाख ६० हजारांचे दागिने, तीन मोबाईल व रोकड असा १ कोटी ७ लाखांचा ऐवज चोरुन नेला.विशेष पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी सातत्याने या प्रकरणात लक्ष देत पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षक अंकित गोयल यांनी तांत्रिक विश्लेषण व गोपनीय खबरीच्या आधारे तपास करत सर्वांनाच टप्याटप्याने ताब्यात घेतले. या घटनेत पोलिसांनी ७६ लाख ३२ हजारांचा रोकड व दागिने असा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
ही कामगिरी कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी,पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक अंकीत गोयल अतिरिक्त पोलिस अधीक्षक आनंद भोईटे,उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अविनाश शिळीमकर,नेताजी गंधारे,राहूल गावडे,अभिजित सावंत,प्रदीप चौधरी,पोलीस उपनिरीक्षक शिवाजी ननवरे,अमित सिदपाटील,गणेश जगताळे, रविराज कोकरे,बाळासाहेब कारंडे,सचिन घाडगे,ज्ञानेश्वर क्षीरसागर,अजित भुजबळ, अभिजित एकशिंगे,स्वप्निल अहिवळे,राजू मोमीन,अतुल डेरे, चंद्रकांत जाधव, मंगेश थिगळे, तुषार पंदारे, जनार्दन शेळके,योगेश नागरगोजे, दिपक साबळे, विक्रम तापकीर, विजय कांचन, अजय घुले, नीलेश शिंदे, अमोल शेडगे, बाळासाहेब खडके, संदीप वारे, धीरज जाधव, अक्षय नवले, मंगेश भगत, मुकुंद कदम, प्रमोद नवले, दगडू वीरकर,अक्षय सुपे यांच्या पथकाने केलेली आहे..