बारामती ( मोरगाव ): महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…
बारामती तालुक्यातील लोणी भापकर येथील सर्पमित्राचा विषारी नाग चावल्याने अखेर आज मृत्यू झाला. हजारो सर्पांना जीवदान देणाऱ्या सर्पमित्रचा मृत्यू झाला असल्याने परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.लोणी भापकर ता. बारामती येथील सर्पमित्र विजय छबुराव यादव हे दिनांक 15 ऑगस्ट रोजी सर्प पकडण्यासाठी सुपा नजीक खराडवाडी येथे गेले असताना त्यांना विषारी नागाने त्यांना दंश केला होता. जनावरांसाठी बनवलेल्या मुरघासाच्या खड्ड्यात नाग पकडण्यासाठी गेले असताना त्यांना हा विषारी नागाने दंश केला होता.
जखमी अवस्थेतही त्यांनी विषारी नागास मोकाळ्या रानांत सोडून दिले होते.दि.१६ ऑगस्ट रोजी त्यांची प्रकृती धोक्यातुन बाहेर आली होती. मात्र आज अखेर मृत्यूशी झुंज देत असताना त्यांची प्राणज्योत मावळली. गेल्या तीस पेक्षा अधीक वर्षापासून ते सर्पमित्र म्हणून शेतकरी व गावोगावी संलग्न झाले होते. शेतकरी अथवा इतरत्र कोणाकडूनही पैसे न घेता सापास जीवदान देण्याचे काम त्यांनी अखेरपर्यंत केले. त्यांच्या म्रूत्युमुळे शेतकरी वर्गाकडून हळहळ व्यक्त होत आहे.
